Diwali 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diwali 2023: दिवाळीत मिठाई अन् तळलेले पदार्थ खाऊन होऊ शकते पोट खराब; करा 'हे' उपाय

दिवाळीत खूप गोड पदार्थ आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. यामुळे चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

Puja Bonkile

Diwali 2023: दिवाळी हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवसांमध्ये सर्व घरांमध्ये मिठाई आणि विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. मात्र, जास्त प्रमाणात मिठाई आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. 

सण-उत्सवात जास्त पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया बिघडू शकते. अशावेळी पोटाची आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

दिवाळीत अशी घ्या आरोग्याची काळजी

बाहेरचे खाणे टाळा


दिवाळीत लोक विविध प्रकारचे पदार्थ आणि मिठाई मोठ्या आवडीने खातात. अनेक लोक असे पदार्थ बाजारातून विकत घेतात. पण बाजारातील पदार्थ तितकेसे चांगले नाही. यामुळे तुम्ही घरीच मिठाई आणि पदार्थ बनवावे. बाजारातील अन्नापेक्षा घरचे पदार्थ आरोग्यासाठी चांगले असते.

जास्त खाऊ नका


अनेकदा लोक चांगले आणि चविष्ट अन्न खाण्यासाठी खूप खातात. हे आरोग्यासाठी खूप वाईट आहे. दिवाळीत अति खाणे टाळावे. त्यामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते.

पदार्थ नीट चावावे


दिवाळीत पोटा संबंधित समस्या टाळण्यासाठी अन्नाचा एक-एक घास चावून खावे. असे केल्याने भूक कमी लागते. अन्न पूर्णपणे चावून खाल्ल्याने आरोग्यासाठी चांगले असते.

गॅसची समस्या


दिवाळीत पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात जडपणा जाणवत असेल तर गॅसची समस्या असू शकते. यावर उपाय म्हणून ओवा आणि जिरे खावे. यामुळे पोटातील जडपणा कमी होतो आणि गॅसची समस्या दूर होत.

कोमट पाणी प्यावे


दिवाळीत दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करावी. यामुळे पचनसंस्था सुरळित कार्य करते. पचन सुधारण्यासाठी आलं मीठासोबत खावे. त्यामुळे पोटासंबंधित अनेक समस्या दूर राहतात..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT