Juices For Eye Health Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Juices For Eye Health: डोळ्यांच्या सर्व समस्या होतील छू मंतर...प्या 'हे' चार ज्यूस

स्त वेळ स्क्रीनवर राहिल्याने त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात

दैनिक गोमन्तक

Juices For Eye Health: आजकाल ऑफिसची बहुतांश कामे कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये होत आहेत. 9-तासांच्या शिफ्टमध्ये बरेच लोक या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर सतत चिकटलेले असतात. तर काही लोक आपला वेळ घालवण्यासाठी तासन्तास चित्रपट, वेब सिरीज किंवा मालिका पाहत राहतात.

अशा लोकांना हे माहीत नसते की जास्त वेळ स्क्रीनवर राहिल्याने त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्राइमरी केअरमधील अभ्यासानुसार, संगणक, लॅपटॉप आणि मोबाइल स्क्रीनवर जास्त वेळ घालवणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते.

यामुळे तुम्हाला मोतीबिंदू, डोळे कोरडे होणे, रातांधळेपणा आणि डोळ्यांशी संबंधित इतर आजार होऊ शकतात. तथापि, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स, सर्व पोषक आणि खनिजे समृध्द अन्न खाल्ल्याने डोळ्यांच्या गंभीर समस्या टाळता येतात.

डोळे निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आणि सकस आहार आवश्यक आहे. यामुळे डोळ्यांच्या संसर्गाची शक्यता कमी होण्यास मदत होऊ शकते. आम्ही तुमच्यासाठी असेच काही पौष्टिक फळ आणि भाज्यांचे ज्यूस घेऊन आलो आहोत, जे पिल्याने तुमचे डोळे निरोगी राहतील.

1. संत्र्याचा रस

डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी संत्र्याचा रस फायदेशीर ठरतो. संत्रा हे व्हिटॅमिन सी च्या मुख्य स्त्रोतांपैकी एक आहे. हा रस प्यायल्याने मोतीबिंदू होण्याचा धोका कमी होतो. डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांची ताकद कायम राहते.

2. बीटरूट, गाजर आणि सफरचंद रस

गाजरात असलेले व्हिटॅमिन ए रातांधळेपणाची समस्या दूर करून डोळे निरोगी ठेवण्याचे काम करते. बीटरूटमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असते. हे मॅक्युलर आणि रेटिना आरोग्यास चालना देण्यासाठी उपयुक्त आहे. सफरचंदांमध्ये भरपूर बायोफ्लेव्होनॉइड्स असतात. बायोफ्लाव्होनॉइड्स दृष्टी सुधारतात असे मानले जाते.

3. पालक, ब्रोकोली आणि काळे रस

हिरव्या पालेभाज्या अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहेत. दृष्टी चांगली ठेवण्यासाठी हे खूप महत्वाचे मानले जातात. यात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनची उपस्थिती असते, जे हानिकारक किरणांचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात.

4. टोमॅटोचा रस

डोळ्यांना आवश्यक असलेले बहुतेक पोषक तत्व टोमॅटोच्या रसामध्ये असतात. टोमॅटोमध्ये असलेले व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम यांसारख्या पोषक तत्वांमुळे दृष्टी वाढण्यास मदत होते. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचे घटक देखील आढळतात. हे एक महत्त्वाचे अँटिऑक्सिडेंट आहे, जे वय-संबंधित मॅक्युलर डीजनरेशनपासून संरक्षण करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT