Fruit Eating Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fruit Eating Tips : फळे खाल्ल्यावर तुम्हीही या चुका करता का? मग वेळीच व्हा सावधान, नाहीतर...

फळांचे सेवन केल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

दैनिक गोमन्तक

उन्हातून फिरून आल्यावर पाणी पिण्याची इच्छा होते. तसेच काही तरी खावेसे वाटते. तेव्हा आपण फळ खाण्यास प्राधान्य देतो. कारण फळांमद्धे मुबलक प्रमाणात पाणी, फायबर, व्हिटामिन्स आणि खनिजे असतात. परंतु फळांचे सेवन केल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे का? तुम्ही घरात हे ऐकलेच असेल की फळे खाल्यानंतर पाणी पिणे टाळावे.

खरंच तुम्हाला माहिती आहे का, फळे खाल्यानंतर थोडा वेळ तरी पाणी पिणे टाळावे. आज याचबद्दल आपण जाणून घेऊया. (Fruit Eating Tips)

फळ खाल्यावर कधी पाणी प्यावे :

  • फळांमध्ये भरपूर प्रमाणात हायड्रेटिंग पॉवर असते. त्यामुळे आपली तहान शांत होण्यास मदत होते. परंतु तुम्हाला फळ खाल्यानंतर तहान लागली असेल तर 30 मिनिटे थांबून पाणी पिणे योग्य ठरू शकते.

  • डॉक्टर आणि आरोग्यतज्ञ हे फळ आणि पाणी पिण्यातील अंतर साधारण 40 ते 50 मिनिटे असावा असा सल्ला देतात.

  • तुम्हाला जर फळ खाल्यानंतर जास्तच तहान लागली असेल तर 30 मिनिटानंतर फक्त दोन किंवा चार घोटच पाणी प्यावे. परंतु एक तास पूर्ण झाल्यास तुम्ही संपूर्ण ग्लास पाणी पिऊ शकता.

  • फळ खाल्यानंतर पोटाची पीएच पातळी आम्लीय असते त्यामुळे फळ खाल्यास लगेच पाणी पिल्याने पचनक्रियेमद्धे आम्ल पातळी पाण्याने भरली जाऊन कमी होऊ शकते.

  • तसेच पाणी हे अन्न पचण्यास मदत करते. परंतु फळ खाल्यानंतर पाणी पिल्यास शरीरातील पंचनशक्ती मंद होते.

  • यामुळे शरीरातील न पंचलेल्या अन्नामुळे छातीती जळजळ होऊन आंबट ढेकर आणि गॅसेसचा त्रास होऊ शकतो.    

  • अनेक फळांमध्ये भरपूर प्रमाणात साखर व यीस्ट असते. यीस्टमुळे पचनक्रियेस मदत होते.  परंतु पाणी पिल्याने ते पोटातच राहते. 

  • त्यामुळे कार्बनडायऑक्साईड तयार होऊन गॅस आणि पोट फुगणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT