Healthy Food Dainik Gomantak
लाइफस्टाइल

'या' पदार्थांमुळे वाढू शकते नैराश्य, आजच खाणे करा बंद

काही पदार्थांचे सेवन केल्याने नैराश्य वाढू शकते. यामुळे खाण्या-पिण्याकडे लक्ष देणे गरजेचे असते.

Puja Bonkile

चुकीची लाइफस्टाइल आणि खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे नैराश्य वाढू शकते. याची इतरही अनेक कारणे असू शकतात. या कारणांमध्ये अनेक पदार्थांचाही समावेश आहे. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया कोणते पदार्थ खाणे टाळावे.

गोड पदार्थ

जर तुम्ही कँडी, पेस्ट्री किंवा यासारखे पदार्थ खात असाल तर काळजी घ्या. कारण या पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे नैराश्य आणि तणाव वाढू शकतो. त्यामुळे असे गोड पदार्थ खाणे टाळावे.

मसालेदार अन्न

जास्त मसालेदार पदार्थ खाल्यास त्याचा विपरित परिणाम आपल्या मूडवर होतो. यामुळे असे पदार्थ खाल्याने मूड खराब होऊ शकतो. त्यामुळे नैराश्य वाढू शकते.

मीठ

मीठ जास्त खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे मीठाचे प्रमाणात सेवन करावे. मीठाचे जास्त सेवन केल्याने नैराश्य वाढू शकते.

कॅफिन असलेले पदार्थ

तुम्ही कॅफीनयुक्त पदार्थ खात असाल तर काळजी घ्या. चहा, कॉफी किंवा सोडा ड्रिंक्सच्या अतिसेवनाने शरीरातील नैराश्य वाढू शकते. त्यामुळे कॅफिन असलेल्या पदार्थांचे योग्य प्रमाणात सेवन करावे.

मद्यपान

जर मद्यपान जास्त प्रमाणात करत असाल तर झोपेवर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच नैराश्य वाढू शकते. यामुळे मद्यपान करणे टाळावे.

तळलेले पदार्थ

जर तुम्ही समोसे, कचोरी यांसारख्या तळलेल्या पदार्थांचे जास्त सेवन करत असाल किंवा ब्रेड, साखर यांसारख्या पदार्थांचे जास्त सेवन करत असाल तर लगेचच तुमची सवय बदला. कारण यामुळे नैराश्य वाढू शकते. यासोबतच फास्ट फूड खाणे टाळावे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT