Drinking water Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Health Tips: तुम्हीही सकाळी दात न घासता पाणी पिता? मग ही बातमी वाचाच

अनेक लोकांना सकाली उठल्यावर पाणी पिण्याची सवय असते.

दैनिक गोमन्तक

Morning Tips: उन्हाळ्यामध्ये भरपुर पाणी पिणे गरजेचे असते. कारण पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. यामुळे अनेक शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात.

आपल्या घरातील वडीलधारी माणसांकडून किंवा आजी-आजोबाकडून तुम्ही ऐकलं असेल की, सकाळी उठल्यानंतर दात ब्रश करण्यापूर्वी सर्वात पहिले भरपूर पाणी प्यावे. यामुळे शरीरातील अनेक घातक घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि आरोग्यही चांगले राहते.

आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक व्यक्तीने सकाळी उटल्यानंतर दात ब्रश करण्यापूर्वी  भरपूर पाणी प्यायला पाहिजे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत मिळते.

याशिवाय शरीरातील अॅसिडिटी, आंबट ढेकर आणि बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होत नाही. सकाळी दात ब्रश करण्याआधी पाणी पिल्यामुळे कोणत्या प्रकारचे फायदे मिळू शकतात हे जाणून घेउया.

1. पचनसंस्थेचं कार्य राहतं चांगलं

तुम्हाला दररोज सकाळी उठल्यानंतर दात ब्रश करण्याआधी भरपूर पाणी प्यायची सवय असेल, तर तुमच्या पचनसंस्थेशी संबंधित समस्या निर्माण होत नाहीत. यामुळे तुमची पचनसंस्था चांगली राहते आणि तोंडात बॅक्टेरियाही जमा राहत नाहीत. 

2. प्रतिकारशक्ती वाढण्यास  होते मदत

दररोर सकाळी पाणी प्यायल्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती सूदृढ राहते. तसेच ज्या लोकांना नेहमी  सर्दी, ताप  यासारख्यी लक्षणे आहेत त्या लोकांनी दररोज सकाळी ब्रश करण्याआधी कोमट पाणी प्यायला हवं. 

3. केस चमकदार राहतात 

दररोज सकाळी दात ब्रश करण्याआधी पाणी प्यायल्यामुळे तुमच्या केसांचं आरोग्यही चांगलं राहण्यास मदत मिळते आणि  केस चमकदार होतात. पण त्यासाठी तुम्हाला नियमितपिणे सकाळी उठल्यानंतर पाणी प्यावं लागणार आहे. 

4. उच्च रक्कदाबाच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत

जे उच्च रक्तदाबाचे रूग्ण आहेत त्यांनी दररोज सकाळी पाणी प्यायची सवय लावून घ्यायला हवं. सकाळी उठल्यानंतर साधं पाणी किंवा कोमट पाणी प्यायला हवं. यामुळे रक्तदाबाची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते. 

5. रक्तातील साखरेची पातळी राहते नियंत्रित 

सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्यामुळे फक्त उच्च रक्तदाबचे रुग्णच नाही तर मधुमेही रूग्णांनाही फायदा होतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी सकाळी उठल्यानंतर दात ब्रश करण्याधी पाणी प्यायची सवय लावून घ्यायला हवी.  यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT