Headache Relief Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Headache Relief Tips: औषध न घेताही कमी करता येते डोकेदुखी

निद्रानाश, हवामानातील बदल, तणाव यामुळे डोकेदुखी होऊ शकते. जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर पुढील उपाय करून कमी होऊ शकते.

Puja Bonkile

 Headache Relief Tips: अनेक वेळा लोकांना डोकेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. निद्रानाश, हवामानातील बदल, तणाव यामुळे डोकेदुखी होऊ शकते. 

जर तुम्ही डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर औषध न घेता तुम्ही पुढील पद्धतींद्वारे देखील डोकेदुखीपासून मुक्त होऊ शकता. कधी कधी कामाचा ताण हे देखील डोकेदुखीचे कारण असू शकते. चला तर मग जाणून घेऊया हे उपाय कोणते आहेत.

प्रकाश मंद ठेवा


जास्त प्रकाश डोळ्यांवर पडणे देखील चांगले नाही. कधीकधी प्रकाशाच्या तेजामुळे डोकेदुखी देखील होऊ शकते. अशा वेळी डोकेदुखीचा त्रास टाळण्यासाठी रूममधील लाइट्स मंद ठेवा. सूर्यप्रकाशापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी चष्मा वापरा.

मानसिक तणाव कमी करावा


अनेक वेळा काम किंवा इतर कोणत्याही गोष्टीशी संबंधित खूप दबाव असतो. यामुळे देखील तीव्र डोकेदुखी होऊ शकते. मानसिक दबावापासून दूर राहावे. डोकेदुखी टाळण्यासाठी आणि डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. कामाच्या लोडमुळे मानसिक दडपणही वाढते. हे टाळण्याचा प्रयत्न करा.

हेड मसाज


डोकेदुखीपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी मसाज करणे हा एक चांगला उपाय आहे. मसाज करून तुम्हाला वेदनांपासून आराम मिळू शकतो. डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी डोक्याच्या मसाजसोबतच कपाळ, मान आणि खांद्यांची मालिश करावी. कधी कधी थकवा आल्यानेही वेदना होतात. मसाज केल्याने तणावही कमी होतो.

कॅफिनचे सेवन


कॅफिनचे सेवन डोकेदुखीमध्ये खूप फायदेशीर आहे. अनेकजण डोकेदुखीवर औषध म्हणून चहाचा वापर करतात. तीव्र डोकेदुखीच्या बाबतीत चहा आणि कॉफीचे सेवन करणे चांगले मानले जाते. जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर चहा किंवा कॉफी प्यायल्याने डोकेदुखणे कमा होऊ शकते.

आल्याचे सेवन


डोकेदुखीवर उपचार करण्यासाठी आल्याचे सेवन करू शकता. आल्याचा चहा घेऊ शकता. यामुळे तुमची डोकेदुखी कमी होऊ शकते. आलं दुधात मिसळूनही वापरू शकता. यामुळे डोकेदुखीपासून बऱ्याच अंशी आराम मिळतो आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT