Happy New Year Rangoli Designs Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Happy New Year Rangoli Designs: नव वर्षाच्या स्वागतासाठी काढा 'या' सुंदर रांगोळी

नवीन वर्षाच्या निमित्ताने लोक अनेकदा घराबाहेर किंवा आत रंगीबेरंगी रांगोळी काढतात.

Puja Bonkile

Happy New Year Rangoli Designs: प्रत्येकजण नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने करतात. लोकांना हा खास प्रसंग त्यांचे कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांसह साजरा करायला आवडतो. ते आधीच नवीन वर्षाच्या पार्टीचे नियोजन करत असतात.

नववर्षाच्या उत्सवात घराची सजावट हाही महत्त्वाचा भाग असतो. कारण त्या दिवशी लोक घरी पार्टी करतात आणि बरेच पाहुणे येतात. नवीन वर्षाच्या निमित्ताने लोक अनेकदा घराबाहेर किंवा आत रंगीबेरंगी रांगोळी काढतात.

या रांगोळ्यांमध्ये 'हॅपी न्यू इयर' असे शुभेच्छा संदेश वेगवेगळ्या रंगात लिहिलेले असतात. त्यामुळे घराला एक खास आणि पारंपारिक लुक येतो. आज काही सोप्या आणि सुंदर रांगोळी डिझाईन्सबद्दल जाणून घेऊया.

असे मानले जाते की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. नवीन वर्षातही रांगोळी काढण्यासाठी तुम्ही सुंदर डिझाइन शोधत असाल, तर नवीन वर्षाच्या या नव्या रांगोळी डिझाइन्स तुम्हाला मदत करू शकतात.

  • वर्तुळाकार रांगोळी


रांगोळीचा हा प्रकार सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही 2024 एका गोलाकार आकारात लिहू शकता. या गोलभोवती तुम्ही रंगीबेरंगी फुले, फुलपाखरे, स्टार आणि इतर डिझाईन बनवू शकता. हे नवीन वर्ष सूचित करतील आणि रांगोळी अधिक आकर्षक बनवतील. तुम्ही हिरवा, लाल, पिवळा आणि निळा इत्यादी अनेक रंग वापरू शकता. हे चमकदार आणि ब्राईट रंग आहेत जे तुम्हाला नवीन वर्षात आनंदी वाटतील.

  • मोराची डिझाईन


नवीन वर्षात मोराची डिझाईन असलेली रांगोळी काढण्याचा ट्रेंड आहे. ही रांगोळी बनवायला खूप सोपी आहे. प्रथम मोठा गोलाकार बेस बनवा. नंतर त्याच्या डाव्या बाजूला मोराचे डोके, मान आणि शरीराचा आकार काढा. त्याच्या समोर दोन्ही बाजूंनी पंखासारखे आकार करा. आता मोराच्या भोवती काही पाने काढावे. त्यानंतर खाली किंवा वर 'हॅपी न्यू इयर 2023' लिहा. यामुळे नवीन वर्षाची एक अतिशय सुंदर रांगोळी तयार होईल. 

  • पानांची डिझाईन


नवीन वर्षासाठी तुम्ही दिवा किंवा विविध आकारांच्या पानांनी सुंदर रांगोळी बनवू शकता. प्रथम पानांचा मोठा आकार बनवा. त्यात '2023' हा लिहा. आता पानाच्या बाहेरील बाजूस लहान दिव्यांचे आकार तयार करा. मग हे सर्व आकार वेगवेगळ्या रंगांनी भरा, तुम्हाला आवडेल तो रंग भरू शकता. अशा प्रकारे तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी एक सुंदर रांगोळी काढू शकता. 

  • रांगोळी काढण्यासाठी तुम्ही डार्क आणि लाइट रंगांच्या रंगसंगतीचा वापर करून सुंदर डिझाईन तयार करू शकता. ते खूप सुंदर दिसेल.

  • फुलांची सुंदर डिझाईनने तुम्ही तुमच्या घराचे आंगण सजवू शकता. रंगीत फुलांनी बनवलेली डिझाईन तुमच्या घराची शोभा वाढवेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

SCROLL FOR NEXT