Happy Life Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Happy Life Tips: मनातील भावना सहज कशा व्यक्त कराल, काही सोप्या अन् उपयुक्त टिप्स

दुसऱ्या व्यक्तींच्या आनंदाची किंवा भावनांची काळजी घेणे ही एक नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण मनाचे ऐकल्याशिवाय नेहमी इतरांच्या इच्छांना महत्व देणे हे देखील योग्य मानता येणार नाही.

Puja Bonkile

Happy Life Tips: एखाद्या व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी जसा पोषक आहार आणि योगा गरजेचा असतो, त्याचप्रमाणे मनातील भावना व्यक्त करणे देखील तितकेच गरजेचे असते. अनेक लोक सहजपणे आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकत नाही. भावना व्यक्त करताना घाबरणे किंवा लहानपणापासून दबावाखाली असणे ही यामागील प्रमुख कारणे आहेत.

दुसऱ्या व्यक्तींच्या आनंदाची किंवा भावनांची काळजी घेणे ही एक नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण मनाचे ऐकल्याशिवाय नेहमी इतरांच्या इच्छांना महत्व देणे हे देखील योग्य मानता येणार नाही. कारण काही दिवसांनंतर तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो. तुम्हालाही जर तुमच्या भावना सहज व्यक्त करायच्या असेल तर तुम्ही खालील टिप्स फॉलो करू शकता.

  • नेहमी मनाचे ऐका

जर तुम्ही स्वत:ची इच्छा व्यक्त करू शकत नसाल तर नेहमी मनाचे ऐकावे. यामुळे तुमचे मन तर हलके होईलचपण अनेक समस्या देखील कमी होतील.

  • स्वत:ला बदला

नेहमी परिस्थितीनुसार स्वत:ला बदलणे गरजेचे आहे. तुम्ही जर मनाचे ऐकत नसाल तर तुम्ही इच्छा व्यक्त करण्याचे धैर्य करू शकत नाही. म्हणून मनाचे नेहमी ऐकावे.

  • नकार स्वीकारा

तुमच्या सर्वच गोष्टी मान्य होतील असे नाही. यामुळे तुम्हाला नकार स्वीकारची सवय असावी. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुकीचे आहे. मनातील भावना व्यक्त करणे कोणताही अपराध नाही किंवा स्वार्थीपणा नाही हे मान्य करावे.

  • संकोच बाळगू नका

मनातील भावना व्यक्त करताना कधीही संकोच बाळगु नका. तुमच्या इच्छा सहजपणे बालल्या पाहिजे. तुमच्या इच्छा पुर्ण होणार नाही अशी भीती वाटते का? किंवा याबाबत कमकुवतपणा वाटतो का? याचा विचार करत बसु नका. मनातील भावना संकोच न बाळगता सांगाव्या.

  • स्वत:सोबत वेळ घालावा

स्वत:सोबत वेळ घालवल्यास अनेक समस्या कमी होऊ शकतात. यासाठी डोळे बंद करावे आणि ज्या गरजा पुर्ण होत नाही त्याबद्दल विचार करा. यामुळे तुम्हाला भावना सहज व्यक्त करता येईल.

  • भीती बाळगू नका

अनेक लोक स्वत:च्या भावना सांगत नाही. कारण त्यांच्या मनात भाती असते. तुम्ही मनातील भीती सोडून आपल्या इच्छा व्यक्त करू शकता.

  • मत स्पष्टपणे मांडावे

अनेक लोक आपआपल्या तत्वांनुसारआणि नियमांनुसार जीवन जगतात. त्यामुळे दुसऱ्यांच्या मनातील गोष्ट सहज समजत नाही. यामुळे तुम्ही तुमच्या इच्छा किंवा भावना दुसऱ्यांसमोर स्पष्टपणे सांगितल्या पाहिजेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT