Happy life Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Happy Life: निरोगी मानसिक आरोग्यासाठी 'या' 4 गोष्टींपासून राहा दूर

प्रत्येकाला आयुष्यात आनंदी राहायचे असते पण कधी कधी अनेक वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते.

Puja Bonkile

Happy Life: इतरांना आनंदी कसे ठेवायचे याबाबत अनेक वेळा चर्चा होते. पण स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी काय करावे याबाबत जास्त चर्चा होत नाही. यामुळे लोकांमध्ये उदासिनता,नैराश्य वाढू शकते. आज आम्ही अशाच काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही स्वत:ला आनंदी ठेवून मानसिक आरोग्य चांगले ठेऊ शकता.

  • टॉक्सिक लोक

स्वतः ला आनंदी ठेवायचे असेल तर टॉक्सिक लोकांपासून दूर राहावे. कारण अशा लोकांमुळे आपल्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. यामुळे आनंदी राहण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी टॉक्सिक लोकांपासून अंतर ठेवून राहावे.

  • तणाव

तुम्ही कुठे राहता? तुम्ही कुठे काम करता? या गोष्टी तुमच्या जीवनावर तुमच्या विचारापेक्षा जास्त परिणाम करतात. तणावपूर्ण वातावरणात तुम्ही कधीच आनंदी आणि शांत राहू शकत नाही. तुम्हाला स्वतःची काळजी असेल तर अशा वातावरणापासून दूर राहावे. यामुळे तुम्हाला मानसिक शांती देखील मिळेल.

  • दुसऱ्याला दोष देणे

जर तुम्ही तुमच्या सर्व समस्यांसाठी दुसऱ्या लोकांना दोष देत असाल तर तुम्ही तुमच्या जीवनावरील नियंत्रण गमावत आहात. अशा लोकांचे मन कधीच शांत राहत नाही. काही दिवसानंतर कुटुंबातील सदस्यही अशा लोकांपासून दुरावतात. यामुळे आपल्या चुका आणि समस्यांची जबाबदारी आपण समजून घेणे गरजेचे आहे. त्यावर उपाय शोधले पाहिजे.

  • इतरांच्या आनंदाची काळजी

प्रत्येकाला आनंदी ठेवणे हे अशक्य आहे. अशावेळी जे लोक स्वतःला त्रास देऊन इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात ते नेहमीच मनातुन दुःखी राहतात. म्हणूनच, प्रत्येकाने असा मार्ग निवडणे गरजेचे आहे, ज्यामुळे त्यांना स्वतःच्या आनंदाचा त्याग न करता इतरांना आनंदी ठेवता येईल. यामुळे तुम्हाला मानसिक शांतताही मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT