Hair oil केसांच्या निरोगी आरोग्यासाठी लाभदायी  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hair oil केसांच्या निरोगी आरोग्यासाठी लाभदायी

मजबूत आणि मुलायम केसांसाठी तेल लावणे लाभदायी असते.

दैनिक गोमन्तक

आपण त्वचेची (Skin) जशी काळजी घेतो त्याप्रमाणेच केसांची (Hair) सुद्धा काळजी घ्यायला हवी. लांब आणि मजबूत केस हवे असेल तर केसांना नियमित तेल लावणे गरजेचे असते. केसांना तेल (Oil) लावल्याने केसांचे आरोग्य चांगले राहून केस मजबूत होतात. तसेच लांब आणि निरोगी केसांसाठी तेल लावणे आवश्यक आहे. केसांसाठी कोणते तेल वापरावे आणि कोणते तेल लावल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते हे आता जाणून घेऊया.

* खोबऱ्याच तेल

केसांच्या आरोग्यासाठी सर्वात जास्त वापरले जाणारे तेल म्हणजे नारळाचे तेल. कारण खोबऱ्याच तेल वापरल्याने केसांची वाढ होण्यास मदत मिळते. या तेलात अनेक पोषक घटक असतात. तसेच केसांच्या मुळा मजबूत होतात. खोबऱ्याच्या तेलात कढीपत्याची पाने, मेथी दाने यांचा वापर करून केसाला लावावे.

* बदाम तेल

बदामचे तेल त्वचेसाठी आणि केसांच्या निरोगी आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. त्यात फॅटी अँसिड , अँटिऑक्सिडंट्स आणि प्रथिने असतात. बदामचे तेल केसांना नियमितपणे लावल्याने केस मुलायम होतात. तसेच केसांची वाढ होण्यास मदत मिळते. रात्री झोपतांना बदाम तेल लावावे आणि सकाळी शॅम्पू करून केस स्वच्छ धुवावे.

* एरंडेल तेल

या तेलात व्हिटॅमिन ई, खनिजे आणि प्रथिने भरपूर असतात. यामुळे केस मजबूत होऊन दाट होतात. एरंडेल तेल लावल्याने केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. तसेच केसांमधील कोरडेपणा कमी करते. या तेलात तुम्ही बदाम तेल किंवा तिळाच तेल मिक्स करून लावू शकता.

* ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑईलमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. यामुळे केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट घटक आपल्या केसांना कंडिशनर करते. यामुळे केस मुलायम होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhagwan Mahavir: धुक्यात हरवलेले जंगल, फेसाळणारा दूधसागर आणि वन्यजीवांचा थरार; पावसात नक्की भेट द्या गोव्याच्या 'या' अभयारण्याला

डिचोली बाजारात वीजवाहिन्यांचा धोका; 'स्पार्क'मुळे व्यापारी भयभीत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Goa Sports Complex: कांपाल क्रीडा, व्यापारी सुविधा भाडेपट्टीवर; खासगी संस्थेमार्फत चालविण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Goa Athletics Championship: राज्यस्तरीय ॲथलेटिक्सला मोठा प्रतिसाद; मनोहर पर्रीकर स्मृती स्पर्धेत 2 हजार ॲथलीट्सचा सहभाग अपेक्षित

VIDEO: शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची एन्ट्री; पाकिस्तानचा खरा चेहरा उघड! व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT