Hair Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hair Care With Home Remedies: तुमच्या स्वयंपाकघरातील 'या' 4 वस्तू करतील पांढरे केस काळे

Hair Care With Home Remedies: यानंतर हे पाणी केसांना लावावे आणि तासभर ठेवल्यानंतर केस धुवावेत.

दैनिक गोमन्तक

Hair Care With Home Remedies: आजकाल लहानापासून मोठ्यापर्यंत अनेकांना केसांबाबतच्या अनेक समस्या दिसून येतात. त्यामध्ये केस गळणे, टक्कल पडणे, केस तुटणे आणि अकाली केसांचे पांढरे होणे या समस्या सर्व वयोगटातील महिला आणि पुरुषांमध्ये दिसून येतात.

अकाली केसांच्या पांढरे होण्याच्या समस्येमुळे आपल्यापैकी अनेकजण त्रस्त होताना दिसत आहेत. अगदी लहान मुलांनादेखील पांढऱ्या केसांच्या समस्येला सामोरे जावे लागते. यासाठी अनेकजण आपापल्या परीने उपाययोजना करत असतात.

आज आपण अशा चार गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामुळे पांढरे केस काळे होण्याची शक्यता आहे. या वस्तू तुम्हाला तुमच्या आजूबाजूला तुमच्या स्वयंपाकघरात मिळतील. याचा उपयोग तुम्ही केसांच्या आरोग्यासाठी करु शकता.

1. काळा चहा

पांढऱ्या केसांचा रंग काळा करण्यासाठी काळ्या चहाचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी आपल्याला फक्त 2 चमचे चहाची पाने आणि एक कप पाणी लागेल. सर्व प्रथम एका भांड्यात पाणी आणि काळी चहाची पाने मिसळा.

हे पाणी काही वेळ उकळल्यानंतर ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. यानंतर हे पाणी केसांना लावावे आणि तासभर ठेवल्यानंतर केस धुवावेत. आठवड्यातून एकदा केसांवर ही रेसिपी वापरल्यास परिणाम दिसून येऊ शकतो.

2. खोबरेल तेल आणि लिंबाचा रस

ही रेसिपी तयार करण्यासाठी तुम्हाला 2 चमचे खोबरेल तेल आणि एक चमचा लिंबाचा रस घ्यावा लागेल. दोन्ही गोष्टी एकत्र करून डोक्याला लावा. या तेलाने केसांच्या मुळांना मसाज करा. केस मुळापासून काळे होऊ लागतात. अर्धा तास डोक्यावर ठेवल्यानंतर डोके धुवा. तुमचे केस हळूहळू काळे होतील.

3. बटाट्याची साले

आपल्यापैकी अनेकांना बटाट्याचे पदार्थ खायला खूप आवडत असते. मात्र केसासांठी बटाट्याचा चांगला वापर करता येतो हे तुम्हाला माहीती आहे का? वास्तविक बटाट्याची साल केसांचे रंग वाढवण्याचे करण्याचे काम करतात.

एक वाटी बटाट्याच्या साली घेऊन त्या पाण्यात टाकून उकळा. त्यांचा स्टार्च बाहेर पडायला लागल्यावर हे पिष्टमय पाणी एका भांड्यात घ्या. बटाट्याच्या सालीचे हे पाणी आठवड्यातून दोनदा केसांना लावता येते.

हे पाणी डोक्याला लावण्याआधी केस शॅम्पू आणि कंडिशनरने धुवा आणि नंतर या पाण्याने डोके धुवा. बटाट्याच्या सालीच्या पाण्याने डोके धुतल्यानंतर केसांना पाणी घालू नका.

4. कॉफी उपयोगी पडेल

पांढऱ्या केसांवर डार्क रोस्टेड कॉफी देखील लावता येते त्यामुळे केस काळे होऊ लागतात. यासाठी अर्धा कप ग्राउंड कॉफी घ्या आणि त्यात पाणी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट तासभर केसांवर ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा. हे उपाय करण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्लादेखील घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT