Grapes Oil Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Grapes Oil Benefits: घनदाट अन् लांब केसांसाठी द्राक्षांच्या बियांचे तेल ठरते फायदेशीर

द्राक्ष खाणे आरोग्यादायी असून केसांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.

Puja Bonkile

Grapes Oil: द्राक्ष खाणे आरोग्यासह मजबुत केसांसाठीही फायदेशीर ठरते. द्राक्षाच्या बीयांपासून बनवलेल्या तेलमध्ये अनेक पोषक घटक असतात. या तेलामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. यामुळे केस घनदाट आणि मजबुत करायचे असेल तर हे तेल वापरावे. केसांची वाढ झपाट्याने होते तसेच केसांसंबंधित अनेक समस्या देखील कमी होतात.

हे तेल वापरल्याने ड्राय आणि निर्जीव केसांच्या समस्या कमी होऊन केस मऊ होतात. या तेलाचा वापर केल्याने कोणते फायदे होतात. हे जाणून घेऊया.

  • केस मऊ होतात

द्राक्षाच्या बियांच्या तेलामध्ये फॅटी अॅसिड तसेच व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. हे तेल केसांना मॉइश्चरायझ करते. हे केसांच्या मुळांना पोषण देण्याचे काम करते. हे तेल नियमितपणे केसांना लावल्यास केस मऊ होतात. केस गळती कमी होऊन मजबुत होतात.

  • केस मजबुत होतात

द्राक्षांच्या बीयांपासून बनवलेले तेल लावल्याने केस मजबुत होतात. कारण या तेलामध्ये फॅटी अॅसिड असते. यामुळे केसांची झपाट्याने वाढ होते. तसेच केसांना फाटे फुटणे बंद होते.

  • केस हेल्दी राहतात

द्राक्षाच्या बियांच्या तेलामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे केसांचे धूळ आणि प्रदूषणापासून संरक्षण होते. तसेच हे हानिकारक अतिनील किरणांपासून केसांचे संरक्षण होते. यामुळे केस हेल्दी दिसतात.

  • तेलाचा कसा वापर करावा

केस धुण्यापुर्वी अर्धातास आधी तेल लावून ठेवावे.अर्ध्या तासानंतर केस शॅम्पुने धुवावे. यामुळे केस मऊ होतात.

  • कोंड्याची समस्या कमी

या तेलामध्ये कोडां कमी करण्याची क्षमता असते.या तेलाने नियमितपणे केसांच्या मुळात मसाज केल्याने कोंडा कमी होऊ शकतो. तसेच केसांमध्ये होणारी खाज देखील कमी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT