Hair Dainik Gomantak
लाइफस्टाइल

जाणून घ्या केस धुण्याच्या योग्य पद्धती

केसांची योग्य निगा राखण्यासाठी, केस किती वेळा धुवावेत असा प्रश्न अनेक लोकांना पडतो.

दैनिक गोमन्तक

स्त्री आणि पुरुषांना केसांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र अनेक कारणांमुळे लोकांचे केस गळतात अथवा पांढरे होऊ लागतात. केसांची योग्य निगा राखण्यासाठी, केस किती वेळा धुवावेत असा प्रश्न अनेक लोकांना पडतो. असे म्हणतात की वारंवार केस धुतल्याने खराब होतात. त्याचबरोबर केस न धुतल्याने केस गळणेही सुरू होते. अशा परिस्थितीत आठवड्यातून किती वेळा आणि केव्हा केस धुवावेत याबाबत लोक संभ्रमात असतात.

केसांच्या प्रकारानुसार हेअर वॉश कधी करायचे ते जाणून घ्या

जर तुमचे केस कोरडे असतील तर आठवड्यातून दोनच वेळा केस धुवावेत.

जर तुमचे केस तेलकट असतील तर आठवड्यातून 5 वेळा केस वॉश केले तरी चालतात.

कुरळे केस आठवड्यातून दोन ते तीन वेळा धुता येतात. जास्त धुतल्याने कुरळे केस अधिक कोरडे होतात. त्यामुळे कुरळे केस आठवड्यातून दोन-तीन वेळाच धुवावेत.

केस धुण्याचा योग्य मार्ग

केस तेलकट व चिकट असतील तर ते धुण्यासाठी शॅम्पूचा वापर करा.

तुम्ही केस सामान्य पाण्याने ओले करून देखील धुवू शकता.

उन्हाळ्यात घामामुळे केस धुण्याची गरज भासते. अशा परिस्थितीत, शॅम्पू अथवा साबनाने देखील केस धुवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT