Gym Guidelines Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Gym Guidelines: जिममध्ये बॉडी बिल्डिंग करण्यासाठी योग्य वय कोणते? वाचा एका क्लिकवर

कोणत्या वयापासून जीममध्ये जावे किंवा बॉडी बिल्डिंग करावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

अनेक लोक वजन कमी करण्यासाठी किंवा बॉडी बनवण्यासाठी जिममध्ये जातात. पण जीममध्ये जाण्याचे योग्य वय कोणते हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर मग जाणून घेऊया तुम्ही कोणत्या वयापासून जिम करू शकता.

लहान वयात जिम जॉईन केल्याने तुमच्या शरीरावर परिणाम होईल का? होय, कारण वयानुसार मानवी शरीर अनेक बदलांमधून जाते. कालांतराने आपले स्नायू मजबूत होतील. म्हणूनच जेव्हा तुम्ही वयाच्या 13 ते 14 व्या वर्षी जिम जॉईन करता तेव्हा तुमच्या स्नायूंमध्ये तग धरण्याची क्षमता नसते.

प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्कआऊटची गरज असते. पण त्यासाठी जिम जॉईन करणे आवश्यक नाही. तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही चालणे, धावणे आणि पोहणे यासारख्या अनेक अॅक्टिव्हिटी करू शकता.

त्याचप्रमाणे, जीमला जाण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या सहनशक्तीचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. बहुतेक लोक आपल्या मुलांना लहान वयातच जीमला जाण्यापासून थांबवतात, कारण त्यांना माहित आहे की आता तसे करण्याची वेळ नाही. 17-18 वर्षांच्या व्यक्तीचे स्नायू 13-14 वर्षांच्या मुलापेक्षा मजबूत असतात. हेच कारण आहे की सर्व पालक आपल्या मुलांना वयाच्या 13 व्या वर्षी जिममध्ये जाण्यापासून रोखतात.

जिममध्ये व्यायाम करण्यासाठी काही वयोमर्यादा आहे का?

अनेक जीममध्ये वयोमर्यादेचा निश्चित केलेली असते. मुलांसाठी काही निर्बंध त्यांच्या फायद्यासाठी आहेत. उदाहरणार्थ, बहुतेक जिम 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना परवानगी देत ​​​​नाहीत. कारण 18 वर्षांखालील व्यक्ती जड व्यायाम करू शकत नाही असे त्यांचे मत आहे. हा कठोर नियम नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT