Guruwar  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

भगवान विष्णूला 'या' 4 गोष्टी प्रिय; गुरुवारी अशी करा पूजा, उजळेल भाग्य

गुरुवार हा दिवस विष्णूला समर्पित आहे. भगवान विष्णूची मनोभावे पूजा केल्याने सर्व शुभ कार्ये विना अडथळा पूर्ण होतात.

Puja Bonkile

गुरुवार हा दिवस विष्णू आणि गुरूचा मानला जातो. या दिवशी सर्व प्रकारची धार्मिक आणि शुभ कार्ये लाभदायक ठरतात. गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व समस्या दूर होतात.

गुरुवारी व्रत केल्याने केवळ भगवान विष्णूच नाही तर माता लक्ष्मी प्रसन्न होते. गुरुवारी भगवान विष्णूला सर्वात आवडत्या गोष्टी अर्पण केल्यास अनेक समस्या दूर होतात आणि कुंडलीत उपस्थित बृहस्पति देखील मजबूत होऊ लागतो.

  • वैजयंती फुलं

शास्त्रानुसार वैजयंतीच्या फुलांचे हार भगवान सत्यनारायण, विष्णू आणि माता लक्ष्मीच्या गळ्यात घालतात. वैजयंतीला भगवान विष्णूला हार अर्पण केल्याने समृद्धी येते आणि पैशाची कमतरता कमी होते.

  • नैवेद्य

गुरुवारी भगवान विष्णूला हलवा, गूळ-हरभरा डाळ, केळी आणि केशरी भात अर्पण करा. हे त्यांचे आवडते भोग मानले जातात.

  • तुळशीचे पानं

तुळशीला भगवान विष्णूच्या शालिग्राम स्वरूपाची पत्नी मानली जाते. म्हणूनच भगवान विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे. गुरुवारी भगवान विष्णूला तुळशीची माळ घातल्याने वैवाहिक जीवन सुखी होते.

  • पितांबर

शास्त्रानुसार पिवळा रंग हा भगवान विष्णूंचा आवडता रंग आहे. यामुळे गुरुवारी पिवळ पितांबर अर्पण केल्याने प्रसन्न होतात. यामुळे आयुर्मान वाढते, मुलांकडून आनंद मिळतो आणि वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात.

  • या गोष्टी करणे टाळाव्या

गुरुवारी केस कापणे अशुभ मानले जाते.

यामुळे मुलांशी संबंधित समस्या निर्माण होतात असे मानले जाते.

गुरूवारी दक्षिण, पूर्व आणि दक्षिण-पश्चिम प्रवास करण्यास मनाई आहे.

गुरुवारी मीठाचे सेवन टाळावे कारण त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT