Red Guava Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Guava In Monsoon: पावसाळ्यात लाल पेरुचे आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम माहीत आहेत का?

Guava In Monsoon: लाल पेरू खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते.

दैनिक गोमन्तक

Eating Guava In Monsoon: आपला निरोगी आरोग्यासाठी चौरस आहार असणे गरजेचे असते. या आहारात कडधान्ये, डाळी आणि पालेभाज्यांसह ऋतुनुसार फळांचादेखील समावेश असणे गरजेचे आहे.

ही फळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करते.

आज आपण पेरुचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत हे जाणून घेणार आहोत.

फळांमध्ये पेरू हे एक अतिशय चवदार आणि फायदेशीर फळ आहे. बहुतांश बाजारपेठेत फक्त पांढरा पेरू उपलब्ध आहे.

लोकांना पेरू कापून काळे मीठ किंवा चाट मसाला घालून खायला आवडते. पेरू पोटाच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो. जेवणानंतर पेरूचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया योग्य राहते.

सर्वांनी पांढरा पेरू खाल्ला असेल आणि त्याचे फायदे देखील माहित असतील. पण तुम्हाला लाल पेरू खाण्याचे फायदे माहित आहेत का?

लाल पेरू पावसाळ्यात येण्यास सुरुवात होते. पांढऱ्या पेरूच्या तुलनेत लाल पेरू खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊयात लाल पेरू खाण्याचे पाच मोठे फायदे.

1. लाल पेरूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. हे अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी देखील समृद्ध आहे.

लाल पेरू मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. लाल पेरूमध्ये साखर खूप कमी असते, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

2. लाल पेरू खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. लाल पेरूमध्ये लोह भरपूर असते.

लाल पेरू खाल्ल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. लाल पेरू शरीरात ट्यूमर बनण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी देखील उपयोगी आहे.

3. आम्ही तुम्हाला सांगतो की, लाल पेरूमध्ये पोटॅशियम देखील जास्त प्रमाणात आढळते. म्हणूनच बीपीच्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर ठरू शकते.

4. लाल पेरूमध्येही फायबर पुरेशा प्रमाणात असते. लाल पेरूमध्ये पाणी खूप कमी असते. हे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

त्यात व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात असते. हे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

5. पांढर्‍या पेरूपेक्षा लाल पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट्स जास्त असतात. हे खाल्ल्याने त्वचेशी संबंधित सर्व आजार दूर होतात.

लाल पेरू त्वचेच्या कर्करोगाचा धोका देखील कमी करू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Para Games 2026: भारताच्या गोल्डन गर्लची कमाल! शीतल देवीने अवघ्या काही तासांत जिंकली दोन सुवर्णपदके; एशियन पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

DA Hike Update: दिवाळीपूर्वी महागाई भत्ता वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते वाढ; मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Ration Card Suspension: गोव्यात रविवारपासून 'या' रेशनकार्डांना बसणार तात्पुरती टाळेबंदी; ई-केवायसीनंतर पुन्हा सक्रिय

Stray Dogs Survey: भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्याच्या आवाहनाला प्रतिसाद नाही; आता चावणाऱ्या कुत्र्यांचे सर्वेक्षण

Mapusa RTI Fine: माहिती अधिकारातील टाळाटाळ भोवली; म्हापसा पालिकेच्या अधिकाऱ्याला 'इतक्या' हजारांचा दंड

SCROLL FOR NEXT