Green tea bag, Green Tea benefits in Marathi, Green Tea Skin Care Tips 
लाइफस्टाइल

वापरलेल्या 'ग्रीन टी'चा चेहऱ्यासाठी होतो असाही फायदा

तुम्ही तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या या युज केलेल्या ग्रीन टीमुळे दूर करू शकता.

दैनिक गोमन्तक

सामान्यतः ग्रीन टी बॅग (Green Tea) वापरल्यानंतर ती निरुपयोगी मानली जाते आणि डस्टबिनमध्ये फेकली जाते, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की ग्रीन टी बॅग तुम्ही कचरा म्हणून फेकत असाल तर असे करू नका. तुम्ही तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या या युज केलेल्या ग्रीन टीमुळे दूर करू शकता. ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे काही काळ गरम पाण्यात राहिल्यानंतरही ग्रीन टी बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात राहतात. निरोगी त्वचेसाठी (Skin Care) अँटिऑक्सिडंट घटक खूप महत्वाचे असतात. (Green Tea benefits in Marathi)

अँटीऑक्सिडंट त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते आणि त्वचेची कोणतीही समस्या जलद गतीने बरी करण्यास मदत करते. अशा प्रकारे, ग्रीन टी वापरल्यानंतर, त्याची पिशवी फेकण्यापूर्वी दोनदा विचार करा. चला तर मग जाणून घेऊया उरलेल्या ग्रीन टी बॅग्जचा वापर त्वचेच्या काळजीमध्ये कसा करता येईल.

फेस स्क्रब बनवा

जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या असतील तर तुम्ही ग्रीन टी बॅग्सपासून तयार केलेला स्क्रब वापरू शकता. याच्या वापराने त्वचा घट्ट होते आणि चेहरा उजळतो. ते वापरण्यासाठी उरलेला ग्रीन टी एका भांड्यात काढून त्यात थोडी साखर मिसळा. आता या मिश्रणाने चेहऱ्याला मसाज करा. यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स दूर होतील.

ग्रीन टी फेस मास्क

एका भांड्यात ग्रीन टीची पाने काढून त्यात थोडे दही, मध आणि हळद मिसळा. सर्व साहित्य चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. साधारण 10 मिनिटांनी चेहरा धुवा. त्वचेवर चमक येईल.

उरलेल्या ग्रीन टिच्या पिशव्या काही वेळ पाण्यात सोडा. त्यानंतर फ्रीजमध्ये फ्रीज करण्यासाठी ठेवा. जेव्हा ते क्यूबसारखे घट्ट होते तेव्हा ते आपल्या डोळ्याभोवती घासून घ्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT