Green Coffee Benefits  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Green Coffee Benefits : ...म्हणूनच लोक ग्रीन कॉफीचे आहेत चाहते; फायदे जाणून तुम्हीही कराल पिण्यास सुरुवात

Green Coffee Benefits : सध्या लोकांमध्ये ग्रीन कॉफीचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे.

दैनिक गोमन्तक

Green Coffee Benefits : ब्लॅक कॉफीचे नाव तुम्ही खूप ऐकले असेल, पण सध्या लोकांमध्ये ग्रीन कॉफीचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. ते तयार करण्यासाठी वनस्पतीच्या हिरव्या रंगाच्या बियांचा वापर केला जातो. प्रथम बिया वेगळ्या करून वाळवल्या जातात, नंतर त्याची पावडर करून करून ग्रीन कॉफी पावडर बनवली जाते.

ग्रीन कॉफीचे असे अनेक फायदे आहेत जे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. लठ्ठपणा, रक्तदाब यासह अनेक समस्यांपासून तुम्हाला आराम मिळतो. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात जे शरीराला निरोगी ठेवतात. ते कसे कार्य करते ते जाणून घ्या. (Green Coffee Benefits For Weight Loss)

ग्रीन कॉफीचे फायदे

1. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांमध्ये लठ्ठपणा सामान्य झाला आहे. ग्रीन कॉफीच्या सेवनाने शरीरातील चरबी झपाट्याने कमी होते कारण त्यात अँटीओबेसिटी फॅक्टर असते. यामध्ये मॅक्रो न्यूट्रिएंट्स आणि कार्बोहायड्रेट्सही भरपूर प्रमाणात आढळतात, त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि तुम्ही जास्त खाण्यापासून वाचता.

2. एका संशोधनानुसार, हे बीपी रुग्णांसाठी रामबाण औषधासारखे काम करते. याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो. हे हृदयविकाराचा झटका आणि मूत्रपिंड निकामी होण्यासारख्या धोकादायक आजारांचा धोका कमी करते.

3. हे एनर्जी बूस्टर म्हणून देखील वापरले जाऊ शकते. यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. ग्रीन कॉफीमध्ये कॅफिन असते, ज्यामुळे डोकेदुखी दूर होते. यामध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण याच्या सेवनाने तणाव कमी होण्यास मदत होते. (Green Coffee Benefits)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT