Google Doodle Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Google Doodle: भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गूगलचे खास डूडल

Google Doodle भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा करत आहे.

Puja Bonkile

Google Doodle Celebrated Of Independence Day: भारत देश आज 77 व्या स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. गुगल नेहमीच सण-उत्सव अनोखे डूडल तयार करून साजरा करत असते. आज स्वातंत्र्यदिनानिमित्त गूगलने खास डूडल तयार करून 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने पारंपारिक कापडसोबत खास  डूडल आर्ट बनवला आहे.

गूगलने डूडलसह पोस्ट केलेल्या मजकुरात लिहिले की, १९४७ मध्ये १५ ऑगस्टला अक नवीन युग सुरू झाले.जेव्हा भारत ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला.

हे डूडल दिल्ली येथील कलाकर नम्रता कुमार यांनी डिझाइन केले आहे. देश आज ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. गूगलने भारताचा स्वातंत्र्यदिवसाचा सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.

गूगलने तयार केलेल्या या अनोख्या डूडलमध्ये गुगलने भारतातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे भव्य कापड शिल्प दाखवले आहेत. या पूर्वीही गुगलने अनेक डूडल तयार करत भारतातील विविध संस्कृती दाखवली आहे. तुम्ही गूगलवर क्लिक केल्यावर तुमच्या स्क्रिवर तिरंग्यातील रंगाचा वर्षाव होतांना दिसतो आहे. अशा प्रकारे खास डूडल तयार केले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर मोदी यांनी देशाला दहाव्यांदा देशाला संबोधित केले. या कार्यक्रमासाठी जवळपास १८०० पाहुण्यांना दिल्लीत आमंत्रित करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT