बटर-चिकन Insta/@spice.girl.eats
लाइफस्टाइल

गोवन स्टाईल बटर-चिकन कॅनडात हिट

गोवन फुड’ या शब्दांना, जिभेवर साऱ्या अभिलाषा गोळा करून आणणारा रसभरीत अर्थ आहे आणि या शब्दांचे महात्म्य फक्त गोव्यातच नव्हे तर जगभर पसरून आहे.

दैनिक गोमन्तक

गोवन फुड’ या शब्दांना, जिभेवर साऱ्या अभिलाषा गोळा करून आणणारा रसभरीत अर्थ आहे आणि या शब्दांचे महात्म्य फक्त गोव्यातच नव्हे तर जगभर पसरून आहे. बेका परेरा (Becca Periera) ही गोमंतकीय युवती कॅनडातल्या (Canada) टोरंटो शहरात आपल्या पूर्वजांच्या या वैभवी अन्न-वारसाला सन्मान प्राप्त करून देत आहे.

सुरुवात अगदी अलीकडेच झाली. तिने 2020 झाली जून महिन्यात आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक चॅलेंज दिली. ‘ना नफा’ तत्त्वावर अन्न कमतरतेविरुद्ध लढणार्‍या एका संस्थेला जर 25 कॅनेडियन डॉलरची कोणी मदत करत असेल तर तिने बनवलेले बटर- चिकन (butter chicken) त्याना मिळू शकेल अशा प्रकारची ती आॅफर होती. या उपक्रमात बेकाला जो प्रतिसाद मिळाला तो फारच उत्साहवर्धक होता.

बेकाने त्या दरम्यानच आपली ‘रिसेप्शनिस्ट’ची नोकरी गमावली होती. तिच्या बटर चिकनला मिळालेल्या प्रतिसादातून तिला आपल्या घरातून पाॅप-अ‍प रेस्टॉरंट सुरू करायचे सुचले आणि त्यातून ‘स्पाइस गर्ल इट्स’चा जन्म झाला. ‘स्पाइस गर्ल इट्स’ आता खवय्यांना टोरेंटो शहरात जेवण पुरवते. गोमंतकीय स्वयंपाक हा कमी टोमॅटो असलेला पण गोड, आंबट, कडवट, खारट आणि तिखट अशा स्वादाने रसनेच्या ग्रंथीना सुखावणारा असतो.

‘स्पाइस गर्ल इट्स’चा वाढणारा व्याप ओळखून बेकाने लागलीच आपल्या आईला मदतीला घेतले. तिची आई गोव्यातल्या नावेली गावची. एका अस्थापनात ती कधीकाळी मुख्य शेफ आणि पार्टनर म्हणून कार्यरत होती. ती म्हणते, ‘ शेफ हे फार दमवणारे काम असते. ते तुमचा सारा जीव पिळून काढते.’ बेका आणि तिच्या इतर तीन मुलींना तिनेच वाढवले आहे. ‘पण मी एक विश्वास ठेवून यात उडी घेतली. आता मी खूप खूप आनंदी आहे.’

बेकाला तिच्या पणजीकडून गोमंतकीय स्वयंपाकाचा वारसा मिळाला आहे. पणजीने आपल्या काळी लिहून ठेवलेल्या पाककृतींचा फायदा आता बेकाला होतो. ते तिचे हस्तलिखित एखाद्या संपन्न वारसासारखे बेकाकडे आले.

गिऱ्हाईके आपली ऑर्डर दर शुक्रवारी नोंदवतात आणि मग त्यानुसार सोमवारपासून बेका आणि आई मिळून कामाला लागतात आणि ठरलेल्या दिवशी गिऱ्हाईके आपले आपले आपले पार्सल गोळा करतात. गेल्या सबंध वर्षात वेगवेगळे 45 तऱ्हेचे अन्नपदार्थ हजारो खवय्यांना बेकाने करून वाढले आहेत.

Becca Periera

‘स्पाइस गर्ल इट्स’ तुलनेने लहान असले तरी शहरातल्या इतर स्पर्धकांचे लक्ष त्याच्याकडे गेले आहे. त्यांनीसुद्धा बेकाच्या हातच्या गोमंतकीय अन्नाची चव घेऊन तिची स्तुती केली आहे. ‘बेकाच्या किचन मधला गंध हा रसना प्रदीप्त करणारा असतो.’ बेका म्हणते, ‘कधी कधी किचनमध्ये असणे धैर्याचे काम असते कारण माझी आई व्यवसायिक आचारी आहे आणि मी या प्रांतात नवखी आहे. अर्थात, मला यातले यातले खूप शिकायचे आहे.’

त्यांच्या मेनूवर विंडालू, शागुती करी, प्रॉन करी यासारख्या हमखास यशस्वी गोमंतकीय पदार्थांबरोबर बटर चिकन, कुर्मा, टिक्का मसाला हे अभिजात भारतीय पदार्थही आहेत. शाकाहारी थाळीही आता त्यात समाविष्ट झाली आहे.

बेका म्हणते. व्याप वाडल्यामुळे आता एखाद्या महत्त्वाच्या स्थळावर स्थलांतर करणे ‘स्पाइस गर्ल...’ला भाग आहे. त्याशिवाय इतर शेफ बरोबर भागीदारी करायचीही त्यांची योजना आहे. तिचे ध्येय सोपे पण स्पष्ट आहे- ‘आमच्या काळात आम्हाला फारसे मिळाले नाही अशा प्रकारच्या कौटुंबिक वाक्याचा अंत करून मला आपल्या कुटुंबाला यशस्वी बनवायचे बनवायचे आहे.’ ‘बटर-चिकन’ने सुरु झालेली ही गोष्ट आता यशोकहाणी बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT