Goan Ambadyachi Uddamethi Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ambadyachi Uddamethi: गोव्यात श्रावण-गणेशोत्सवात बनणारी 'आंबाड्याची उड्डामेथी'! 10 मिनिटात बनते रेसिपी

गोवन रेसिपीज् सीरीजच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आंबाड्याची उड्डामेथी (Ambadyachi Uddamethi or Goan Hog Plum Curry).

Kavya Powar

Goan Ambadyachi Uddamethi Recipe

गोवन रेसिपीज् सीरीजच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आंबाड्याची उड्डामेथी (Ambadyachi Uddamethi or Goan Hog Plum Curry). आंबाड्याची उड्डामेथी ही एक गोवन हिंदू घरांमध्ये बनणारी रेसिपी आहे.

ही डिश सामान्यतः श्रावण आणि गणेश चतुर्थीच्या पवित्र महिन्यात तयार केली जाते. ही डिश कांदा आणि लसूणाशिवाय बनत असून अत्यंत शुद्ध शाकाहारी मानली जाते. कारण चातुर्मासात गोव्यातल्या घरांमध्ये प्रामुख्याने कांदा आणि लसूण जेवणातून वगळला जातो.

चला तर मग पाहूया याची झटपट रेसिपी.....

साहित्य

  • आंबाडे

  • लाल मिरच्या

  • किसलेले ओले खोबरे

  • धणे

  • मेथीदाणे

  • तांदूळ

  • हिंग

  • मीठ

  • गूळ

  • तेल

  • पाणी

कृती

  • आंबाड्याची उड्डामेथी करण्यासाठी सगळ्यात आधी आंबाडे स्वच्छ धुऊन त्याची साले काढून घ्या.

  • त्यानंतर त्याला मीठ लावून थोडा वेळ बाजूला ठेवा.

  • यानंतर पॅनमध्ये पाच बेडगी मिरच्या, धणे, उडीद डाळ आणि चमचाभर तांदूळ हलके भाजून घ्या.

  • वरील सर्व पदार्थ थंड झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये काढून त्यात किसलेले ओले खोबरे टाकून त्यांची ग्रेव्ही बनवून घ्या.

  • यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये मोहरी टाका.

  • थोडेसे मेथीचे दाणे टाका, त्यानंतर धुऊन साल काढून घेतलेले आंबाडे टाका आणि वाटीभर पाणी ओता.

  • काही वेळ आंबाडे असेच कढईमध्ये हलवून त्यानंतर तयार केलेलं वाटण याच्यामध्ये टाका. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाका आणि दोन चमचे गूळ टाका.

  • सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.

  • त्यानंतर व्यवस्थित उकळी येऊ द्या. तयार आहे गोवन आंबाड्याची उड्डामेथी.

आंबाड्याची उड्डामेथी ही एक चविष्ट गोवन स्टाईल करी आहे. ही भातासोबत करी सर्व्ह करू शकता. ही रेसिपी आपल्यासोबत मधुरा वायंगणकर यांनी शेयर केली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT