plan goa trip  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

First Goa Trip: 'या' अनोख्या ठिकाणांना द्या भेट

तुम्ही जर गोव्याला पहिल्यांदाच सहलीसाठी जात असला तर या ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका.

Puja Bonkile

* आग्वाद किल्ला

आग्वाद किल्ला 17 व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला आणि दीपगृह आहे. हे सिंक्वेरिम बिचवर असलेल्या वसलेले आहे. हा किल्ला मुळत: डच आक्रमणाविरुद्ध बांधला गेला होता. गोव्यातील (Goa) एक भव्य प्रेक्षणीय भव्य स्थळ म्हणून ओळखले जाते. यामुळे गोव्याला गेल्यावर या किल्ल्याला भेट द्यायला विसरू नका.

Aguada Fort

* दूधसागर धबधबा

गोव्यातील (Goa) दूधसागर धबधबा हे अनेक पर्यटकांचे मन वेधून घेणारे ठिकाण आहे. मंडोवी नदीवर वसलेले आहे. तुम्ही येथे जीप सफरीचा आनंद घेवु शकता. पण तुम्हाला जर खरा आनंद घ्यायचा असेल तर येथे तुम्ही पावसाळ्यात ट्रेकिंग करण्यासाठी जावु शकता.

Dudhsagar Falls

गोव्यातील अंजुना फ्ली मार्केट (Anjuna Flea Market) हे प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे फ्ली मार्केट फक्त बुधवारीच सुरू असते. येथे इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते कपडे आणि फळांपर्यंत अनेक गोष्टी ऑफरवर असतात. पर्यटकांचे (Tourist) हे एक आवडते ठिकाण आहे.

Anjuna Flea Market

गोव्यातील सुंदर समुद्रकिनारे (Beach) फिरल्यानंतर, तुम्ही इथल्या लेण्यांचे दर्शन करण्यासाठी निघू शकता. ज्या कलेचा प्रभाव असलेला भूतकाळ प्रतिबिंबित करतात. उदाहरणार्थ, गोव्यातील लामगौ लेणी, लॅटराइटपासून कोरलेली, जी काहीशी नाजूक आहे. मोठ्या प्रमाणात पाम वृक्षांनी वेढलेल्या, या लेणी गोव्यातील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहेत. हे ठिकाण पणजीपासून (Panji) सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या बिचोलीममध्ये वसलेले आहे.

Lamgau Caves

गोव्यातील हे एक अविश्वसनीय चर्च (Church) असून यूनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. ही सुंदर वास्तुकला 1605 पासून आहे. हे रोमन कॅथोलिक बॅसिलिका ख्रिश्चन धर्माच्या इतिहासात एक महत्वाची खूण असल्याचे म्हटले जाते. गोव्यातील एक अतिशय महत्वाचे पर्यटन स्थळ आहे.

Basilica of Bom Jesus

गोव्याचे (Goa) हे एक अनोखे संग्रहालय आहे. येथे तुम्हाला गोव्याचे जुने मार्ग, गोवन लोकांच्या चालीरीती पाहायला मिळतील. येथे तुम्हाला रेस्टॉरंट, डान्स फ्लोअर आणि बऱ्याच गोष्टीचा आनंद घेता येईल.

Ancestral Goa Museum

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT