Goa Women's Health Dainik Gomantak
लाइफस्टाइल

स्त्रियांना आत्मनिर्भर करणारी गोव्याची ‘पॅड वुमन’

Goa Women's Health: जयश्रीने इतकेच नव्हे तर सुमारे तीस स्त्रियांना (Women) रोजगारही दिलेला आहे

दैनिक गोमन्तक

लहान असताना जयश्रीने कमाई करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कामे केली आहेत. अगदी झाडू विणण्यापासून ते लोकांची अंगणे साफ करण्यापर्यंत. आज जयश्री स्वतःच्या पायांवर उभी आहे. इतकेच नव्हे तर सुमारे तीस स्त्रियांना (Women) तिने रोजगारही दिलेला आहे. तिची यशोगाथा तिच्या कठोर कष्टांची कहाणी आहे. आज ती गोव्यात ‘पॅड वुमन’ म्हणून ओळखली जाते. ती फक्त बायोडिग्रेडेबल पॅड बनवत नाही तर मसाले, पापड, लोणचे, साबण इत्यादी गृहोपयोगी वस्तू बनवणेही तिच्या कुटिरोद्योगाचा भाग आहे. (Goa's Pad Women News)

वयाच्या अकराव्या वर्षी, काम करून स्वतःची कमाई करायला शिकलेल्या जयश्रीचे शिक्षण फारसे झालेले नाही. घरात परिस्थिती अशी होती की कुटुंबाचा प्रत्येक सदस्य काही ना काही काम करून घरच्या चरितार्थाला हातभार लावत होता. शिक्षण नसले तरी जयश्रीकडे उपजतच तीव्र बुद्धी होती. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची कामे शिकण्याची व करण्याची सवय तिला पूर्वीपासूनच होती. आपल्या उद्योगासाठी आवश्यक असणारे धैर्यही तिच्याकडे होते. सुरुवातीला ती लोकरीचे (वुल) वेगवेगळे प्रकार बनवायची, एम्ब्रॉयडरी करायची. लोकांना तिचे पॅटर्न आवडायचे. दुकानदारही तिने तयार केलेल्या वस्तू, तिने शिवणकाम केलेले कपडे आपल्या दुकानांवर विकायला ठेवायचे.

दरम्यानच्या काळात जयश्री महिला स्वयंसेवी संघटनांच्या संपर्कात येऊन त्यांची सदस्य बनली होती. एका स्वयंसेवी संघटनेच्या एका सभेत प्रश्न विचारला गेला की मासिक पाळीच्या (Menstruation) वेळेस महिलांना आवश्यक असलेल्या पॅडची निर्मिती करायचा उद्योग सुरू करण्यासाठी कोणी तयार आहे का? पॅड म्हटल्यावर अनेक प्रश्न उद्भवतात. त्यात संकोचापासून विक्रीपर्यंतच्या साऱ्याच प्रश्नांचा समावेश असतो. सभेत त्यामुळे या प्रश्नाला उत्तरं न देता इतर स्त्रिया गप्प राहिलेल्या असताना जयश्री परवारचा हात वर गेला. आपण पॅडच्या उत्पादनासाठी तयार असल्याचे त्या सभेत तिने जाहीर केले तेव्हापासून, म्हणजे 2015 पासून जयश्री ‘पॅड’ उत्पादनाच्या क्षेत्रात आहे.

तिने या उत्पादनाची माहिती मिळवून उत्पादनास सुरुवातही केली. बाजारात मिळणारे ब्रँडेड पॅड आणि जयश्री बनवत असलेल्या बायोडिग्रेडेबल पॅडमध्ये फरक हा आहे की जयश्रीच्या कारखान्यात तयार होणारे पॅड, वापरानंतर जमिनीत पुरून टाकल्यावर, आठ दिवसांनी पूर्णपणे मातीत मिसळून जातात. मातीत त्यामुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. पाइनवुडपासून बनलेल्या एका विशिष्ट पेपरला ग्राइंडरमध्ये टाकून त्याचा लगदा बनवला जातो. वरची पट्टी दिसायला प्लास्टिकसारखी असली तरी तो एथेनिल पेपर असतो. वर बटर पेपर वापरला जातो आणि कुठल्याही प्रकारचे रसायन पॅड बनवताना वापरले जात नाही.

गाजाबाग येथील एका शाळेने तिच्या कारखान्यात बनलेले पॅड वापरून एक प्रयोगही केला. पॅड एका मोठ्या ड्रममध्ये टाकले गेले. वर माती पसरवण्यात आली व त्यावर फुलांच्या बिया रुजायला घातल्या गेल्या. त्याना पाणी दिले गेले. काही काळाने त्या ड्रममध्ये फुलझाडे वाढून त्यांना फुलेही आली. पॅडचा कुठलाही दुष्परिणाम मातीवर होत नसल्याचे सिद्ध झाले होते.

जयश्रीच्या कारखान्यात बनणाऱ्या पॅड्सना जरी खूप मागणी असली तरी तिचा तो उद्योग लहान असल्याकारणाने ती साऱ्या ऑर्डरी स्वीकारू शकत नाही. कुठल्याही प्रकारच्या सरकारी मदतीशिवाय तिने स्वतःचा हा उद्योग उभारला आहे. एक काळ होता की राष्ट्रीयकृत बँकांनीदेखील तिला कर्ज देण्यास नकार दिला होता. आज तिचा व्यवसाय स्थिरस्थावर आहे. शाळांमधून तसेच अनेक प्रदर्शनांमधून, आपल्या कारखान्यात तयार होत असलेले पॅड सुरक्षित कसे आहेत हे तिने अनेक महिलांना (Women) समजावून सांगितले आहे व खात्री पटल्यानंतर अनेक स्त्रियांनी हे पॅड (Pad) वापरण्यास सुरुवातही केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT