Goa Institute Management | AIM2 Flourish Dainik Gomantak
लाइफस्टाइल

गोवा इन्स्टिट्युट मॅनेजमेंटला आंतरराष्ट्रीय ‘एम टू फ्लरिश’ चे विजेतेपद

Goa News: ह्या स्पर्धेत गोवा इन्स्टिट्युट मॅनेजमेंटमधील एकूण 4 संघांना अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

जागतिक पातळीवर आयोजित होणाऱ्या ‘एम टू फ्लरिश’ यंदाच्या स्पर्धेत गोवा इन्स्टिट्युट मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले आहे. जगभरातून 685 स्पर्धकांमध्ये ह्या विद्यार्थ्यांना विजेते म्हणून घोषित आले. निर्धारित केलेल्या 17 जागतिक उद्धिष्टांपैकी प्रत्येकाशी संबंधित एकूण 17 विजेत्यांची घोषणा दरवर्षी केली जाते. विविध देशातील अनेक संस्थांमधील विद्यार्थी ‘एम टू फ्लरिश’ च्या वेबसाईटवर आपले प्रकल्प सादर करतात.(Goa Institute Management)

ह्या स्पर्धेत गोवा इन्स्टिट्युट मॅनेजमेंटमधील एकूण 4 संघांना अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले होते. गोवा (Goa) इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विषयातल्या व्यवसायासंबंधी संशोधन करून त्या व्यवसायातील अनोखी कल्पना व त्यातील क्षमता ओळखली. त्यानंतर त्या व्यवसायात असणारी व उत्त्म काम करणारी एक कंपनी निवडली.(AIM2 Flourish)

त्यातल्या व्यावसायिकाची मुलाखत घेतली आणि नंतर आपली विशिष्ट मांडणी/कथा सादर केली. या वर्षीच्या, “एव्हरी ड्रॉप काउंट्स” नावाच्या विजेत्या मांडणीमध्ये ‘अ‍ॅबसोल्युट वॉटर प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे वैशिष्ट्यांचा अभ्यास केला गेला आहे ज्याची गणना ‘स्वच्छ पाणी आणि स्वच्छते’च्या अंतर्गत करण्यात येते. जतीन त्रिपाठी, कुशाग्र बन्सल, आकाश घोष, श्रीकरण शेणवी सुरसुरे आणि अनुष्कर चौहान हे विद्यार्थी या प्रकल्पाचे संशोधक होते आणि त्यांना जीआयएमच्या सामान्य व्यवस्थापन आणि अर्थशास्त्राच्या प्राध्यापक दिव्या सिंघल यांनी मार्गदर्शन केले.

तर ह्या प्रकल्पावर काम करणाऱ्या विद्यार्थ्याना या विषयाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले, “अ‍ॅबसोल्युट वॉटर ही एक कंपनी आहे जी इतरांपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने काम करते.

ते त्यांच्या विशिष्ट जलव्यवस्थापन पद्धतींद्वारे पर्यावरणाला कसे योगदान देत आहेत याविषयी खोल अभ्यास करणे अत्यंत मनोरंजक होते. एक विद्यार्थी म्हणून, विशेषत: प्राध्यापक सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली ही खरोखरच ज्ञानवर्धक प्रक्रिया होती. गोवा इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटद्वारे आम्हाला ही संधी दिली गेली याचा आम्हाला खरोखर आनंद आहे आणि आम्हाला आशा आहे की आमची ही मांडणी भविष्यातील पिढ्यांना पर्यावरण सुधारण्यासाठी योगदान देईल.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT