goa| Jackfruit Dainik Gomantak
लाइफस्टाइल

पाऊस सुरू झाला की वाया जातात फणस.... कुणी उपाय करेल का?

गोव्यात (Goa) फणसपोळ्या एकेकाळी फार लोकप्रिय होत्या. परंतु आज त्या केवळ पर्यटकांपुरत्या (Tourist) मर्यादित झाल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

मनोदय फडते

ऊस सुरू झाल्यानंतर सर्वात प्रथम जर कुठल्या फळावर संक्रांत येत असेल तर तो आहे फणस. बहुगुणी आणि बहुउपयोगी मधुर फळ म्हणून ओळखला जाणारा फणस वेळीच पिकला तरच त्याचा उपयोग होतो. पावसानंतर मात्र या फळाचा काही उपयोग होत नाही उलट, झाडावरून गळून पडलेल्या फणसांमुळे (Jackfruits) त्या परिसरात डासनिर्मिती होते आणि लोकांना त्रासच अधिक सहन कराव्या लागतो. काप्या फणसाला बाजारात भाव असतो पण रसाळ फणस मधुर असला तरी तो बाजारात खपत नाही. रसाळ फणस पावसापूर्वी पिकला तर काही प्रमाणात फणस पोळीसाठी तरी वापरला जाऊ शकतो.

वरून काटेरी पण आत गोड गरे असलेले हे फळझाड गोवा (Goa) व कोकणातले खास फळ आहे. शहरांमधूनही अनेकांच्या बागेत फणसाची झाडे असतात आणि मोठमोठे फणस त्याला लगडलेले दिसतात. कच्च्या फणसाची भाजी, पापड, फणसपोळी इत्यादी करतात. काप्या फणसाचे गरे तर मोठ्या आवडीने खाल्ले जातात. मात्र फणस हा नेहमीच उशिरा पिकला जात असल्यामुळे (पाऊस सुरू झाल्यानंतर) बागायदाराना या रसाळ आणि मधुर फळांच्या उत्पादनाचा पूर्ण लाभ घेता येत नाही.

100 ग्रॅम फणसातून आपल्याला अंदाजे 65 कॅलरीज मिळतात. इतर कुठल्याही फळांपेक्षा (Fruits) या फळाच्या माध्यमातून आपल्याला भरपूर प्रमाणात, म्हणजे 11 टक्के इतका फॉस्फरस प्राप्त होतो. फॉस्फरस आपल्या शरीरातील कॅल्शिअमचा महत्त्वाचा मदतनीस असतो आणि मज्जासंस्थेतील पेशींना फॉस्फरसची विशेष गरज असते.

ऑस्करच्या कमतरतेमुळे मुडदूस (रिकेट्स) ही व्याधी होते. कृश व्यक्तींचे वजन (Weight) वाढवण्यासाठी फणस उपयुक्त आहे. फणस एक पुरेसे ऊर्जादायी फळ आहे. बरक्या फणसाचे गरे फेटून केलेल्या फणसपोळ्या (साठां) माधुर्य व शक्ती प्रदान करतात. चळवळ्या अंग न धरणाऱ्या मुलांना फारशी साखर न घालता केलेल्या अशा पोळ्या उन्हाळ्यात खाऊ म्हणून द्याव्यात. ती मुले तरतरीत तर होतातच परंतु त्यांचे अंगही सुधारते आणि दातही बळकट होतात. गोव्यात (Goa) फणसपोळ्या एकेकाळी फार लोकप्रिय होत्या. परंतु आज त्या केवळ पर्यटकांपुरत्या (Tourist) मर्यादित झाल्या आहेत.

काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात कच्चे गरे काढून, त्याना मिठाच्या पाण्यात साठवून, पावसाळ्यात (Monsoon) त्याची भाजी करण्यासाठी वापर केला जात असे. पण फणसाचा असा वापर करण्याचे आताच्या पिढीला क्वचितच माहिती असेल. फणसाचे गरे काडून तेलात तळून विक्री करणारे काही जण अजून काही आहेत.

पण वाढत्या महागाईत खिशाला दर परवडत नसल्याने, ग्राहक खरेदी करण्याचे टाळतात. फणसाचे उपयोग खूप आहे पण योग्य मार्गदर्शन नसल्याने गोव्यात त्यांचे उत्पादन वाया जाताना दिसते. शासकीय पातळीवर फणसाचा वापर होण्यासारखा एकदा प्रकल्प राज्यात तयार झाला असता तर बागायतदाराच्या हातात चार पैसे नक्कीच राहू शकले असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta Fine 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Russian Woman Viral Video: 'पाणीपुरी नको!' म्हणत रशियन महिलेनं फिरवली पाठ; पण भेळपुरीची चव चाखताच म्हणाली, Wow.... पाहा व्हिडिओ

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! भारतीय खेळाडूकडून हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, पोलिसांकडून कारवाई

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

SCROLL FOR NEXT