Glowing Skin| Milk ice cube Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Milk Ice Cube For Glowing Skin: त्वचेला चमकदार बनवण्यासाठी वापरा 'मिल्क आइस क्यूब', जाणून घ्या कसे बनवाल

मिल्क आइस क्यूब चेहऱ्यावर लावल्याने त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते.

Puja Bonkile

Milk Ice Cube For Glowing Skin: जर तुम्हीही त्वचेशी संबंधित समस्यांमुळे त्रस्त असाल आणि त्यावर योग्य उपचार मिळत नसतील, तर दुधापासून बनवलेले आइस क्युब चेहऱ्यावर लावु शकता. यातून तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

दुधामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचेला दुरुस्त करण्याचे काम करते आणि तुमच्या त्वचेला जीवदान देते. चला जाणून घेऊया याचे फायदे कोणते आहेत.  

  • टॅनिंग

त्वचेवरील (Skin) टॅनिंगची समस्या असली तरी कच्च्या दुधापासून बनवलेल्या आइस क्यूबने चेहऱ्याची मसाज करू करावी. दुधामध्ये प्रोटीन बी 12 आणि झिंक असते. ज्यामुळे त्वचा चमकदार बनते.

  • कोरडी त्वचा

तुमची त्वचा कोरडी झाली असली तरी तुम्ही मिल्क आइस क्यूबने फेशियल मसाज करू शकता. दुधात बायोटिनसह अनेक मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. हे चेहऱ्यावर (Face) लावल्याने निर्जीव, भेगा, कोरड्या आणि कोमेजलेल्या त्वचेला पूर्ण पोषण मिळते.

  • एक्सफोलिएट

मिल्क आइस क्यूब लावल्याने त्वचा एक्सफोलिएट होण्यास मदत होते. कच्च्या दुधात बीटा हायड्रॉक्सी ऍसिड नावाचा एक्सफोलिएटिंग एजंट असतो. हे तुमची त्वचा एक्सफोलिएट करण्यात मदत करते आणि मृत पेशी तसेच ब्लॅकहेड्स काढून टाकते.

  • चेहऱ्यावरील ग्लो

चेहऱ्यावर दूध (Milk) लावल्याने नक्कीच फायदा होतो. त्यापासून आइस क्यूब बनवून चेहऱ्यावर लावल्यास त्वचाही चमकदार होते. त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. 

रक्ताभिसरणात सुधारणा होऊन त्वचा चमकदार होते. त्याचबरोबर बर्फामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड आणि प्रथिने त्वचेला तजेलदार बनवण्यास मदत करतात.

  • डार्क सर्कल

तुम्हाला डार्क सर्कलची समस्या असली तरी तुम्ही आइस क्यूब लावू शकता. यामुळे डार्क सर्कलची समस्या दूर होईल आणि त्वचा चमकदार होईल.

  • सूज

चेहऱ्यावर बर्फाचे तुकडे लावल्याने सूज येण्याची समस्याही कमी होते. डोळ्यांखालील फुगीरपणा देखील सहज निघून जाईल. सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर सूज आल्याचे दिसले तर तुम्ही गोलाकार हालचालीत चेहऱ्यावर (Face) आणि डोळ्यांखाली बर्फ लावू शकता.

Ice On Face
  • मुरुम

दुधाचा बर्फाचा तुकडा त्वचेवर चोळल्याने मुरुमांची समस्याही सहज दूर होते. त्वाचा चमकदार दिसते.

  • आइस क्यूब कसा बनवायचा

एका भांड्यात दूध घ्या आणि त्यात एक चमचा मध घालावे. 1 ते 2 मिनिटे नीट मिक्स केल्यानंतर, बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवावे. 2 ते 3 तास फ्रिज करण्यासाठी ठेवावे. तुमचा आइस क्यूब तयार आहे. तुम्ही ते तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT