Non Veg Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Gatari Amavasya मित्रांसोबत एन्जॉय करत असाल तर या 5 महाराष्ट्रीयन रेसिपी करा ट्राय

आम्ही तुमच्या लाडक्या लोकांसाठी तोंडाला पाणी येणार अशा पाच अस्सल महाराष्ट्रीयन पाककृती सांगणार आहोत.

दैनिक गोमन्तक

Gatari Amavasya 2022: पवित्र श्रावण महिन्याच्या आधी, मराठी लोक गटारी हा प्रादेशिक सण फक्त खाण्यापिण्यासाठी साजरा करतात. श्रावण महिन्यात अनेक पाककलेवर बंधने येतात आणि लोकांनी त्यांच्या आवडत्या मांसाहारी पदार्थाची मेजवानी करण्यासाठी महिनाभर वाट बघावी लागते. महाराष्ट्रात मराठी दिनदर्शिकेनुसार आषाढ महिन्यात अमावस्या किंवा रविवारी गटारी साजरी केली जाते. कुटुंबातील सदस्य, जवळचे मित्र आणि इतर नातेवाईकांसह घरी खाण्यापिण्याच्या उत्सवाचे आयोजन करून मोठ्या मेजवाणीचे आयोजन केले जाते. आम्ही तुमच्या लाडक्या लोकांसाठी तोंडाला पाणी येणार अशा पाच अस्सल महाराष्ट्रीयन पाककृती सांगणार आहोत.

1. कोल्हापुरी मासा

महाराष्ट्रातील कोल्हापूरचा प्रदेश तिखट, झणझणीत आणि तांबड्या पांढऱ्या रस्स्यासाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही भात किंवा भाकरीसोबत महाराष्ट्रीयन कोल्हापुरी फिश करी चा आस्वाद घेऊ शकता.

2. खर्डा चिकन

गरम मसाला पावडर आणि लिंबाचा रस मिसळून खर्डा चिकनची थाळी एक डिश आहे. मसालेदार आणि स्वादिष्ट चटणी भाकरीसोबत ही डिश चविष्ट लागते.

3. मालवणी प्रॉन करी

सीफूड प्रेमींसाठी, कोकण स्पेशल मालवणी प्रॉन करी ताजी कोळंबी नारळाच्या ग्रेव्हीमध्ये एकत्र करून आणि खास मालवणी मसाला घालून शिजवली जाते!

4. वजाडी

वजाडी उर्फ ​​​​बकरीचे मास, हा शब्द तुम्हाला नविन असेल. पण हा अत्यंत चवदार पदार्थ आहे! हे मटण चवीष्ट असते आणि हलक्या करीमध्ये शिजवले जाते.

5. काळ मटन करी

काळ मटण म्हणून ओळखल्या जाणार्‍या करीमध्ये ताजे भारतीय मसाले वापरले जाते. त्यामुळे हे मटण चविला खूप खास असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT