Ganpati Bappa  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ganesh Utsav 2022: गणेश चतुर्थीला दोन अतिशय शुभ योगांमध्ये गणपतीचे होईल आगमन

Ganesh Festival 2022: 10 दिवस साजरा होणारा गणेश उत्सव यंदा 31 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

दैनिक गोमन्तक

गणेश उत्सव हा हिंदूंचा मोठा सण आहे. भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. 10 दिवस साजरा होणारा गणेश उत्सव यंदा 31 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार आहे. अनंत चतुर्दशी म्हणजेच गणेश विसर्जन 9 सप्टेंबर 2022 रोजी होईल. यंदा गणेश चतुर्थीला एक विशेष योग बनत असून त्यामुळे या दिवसाचे महत्त्व दुपटीने वाढणार आहे. गणेश चतुर्थीचा शुभ योग आणि महत्त्व जाणून घेऊया.

* गणेश उत्सव 2022 तारीख
भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी 30 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 3:34 वाजता सुरू होईल. दुसरीकडे चतुर्थी तिथी दुसऱ्या दिवशी 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3:23 वाजता समाप्त होईल.

* गणेश उत्सव 2022 योग

यंदा गणेशोत्सव (Ganesh Festival) बुधवारपासून सुरू होत असून बुधवार हा गणपतीला समर्पित आहे. यासोबतच गणेश चतुर्थीला रवियोगाचाही योग जुळून येत आहे. या दोन विशेष योगांमुळे गणेश चतुर्थीचे महत्त्व आणखी वाढले आहे. रवियोगात गणपती बाप्पाची पूजा केल्याने सर्व संकटांचा नाश होतो असे मानले जाते. गणपती जी भक्तांची सर्व दुःखे दूर करतात. असे म्हटले जाते की रवि योगामध्ये सर्व अशुभ योगांचे प्रभाव दूर करण्याची शक्ती आहे.

रवि योग - 31 ऑगस्ट 2022, सकाळी 06.06 - 1 सप्टेंबर 2022, सकाळी 12.12

10 दिवसांच्या गणेशोत्सवाचे महत्त्व
प्रथम गणेशाची आराधना केल्याने सर्व बाधा दूर होतात. असे मानले जाते की भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीपासून या महिन्याच्या चतुर्दशी तिथी म्हणजे गणपतीचे पृथ्वीवर 10 दिवस वास्तव्य असते. गणेश चतुर्थीला घराघरात आणि पंडालमध्ये गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. असे म्हणतात की या दिवसांत जो व्यक्ती घरी बसून गणेशाची खऱ्या मनाने पूजा करतो, त्याच्या जीवनातील तणाव दूर होतो. सुख-समृद्धी येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

SCROLL FOR NEXT