Fruits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Diet: 'या' पाच फळांमध्ये असते भरपूर प्रोटीन

Healthy Diet: शरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थ खावेत.

दैनिक गोमन्तक

Healthy Diet: शरीराला एकदम तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रोटीन फार महत्वाचे पोषक तत्व आहे. वजन कमी जास्त करणे, चांगली शरीरयष्टी मिळवणे यासाठी प्रोटीन फायदेशीर ठरते. प्रोटीनचे भरपूर फायदे असल्याने लोकं कोणते पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला मुभलक प्रमाणात प्रोटीन मिळेल याचा शोध घेत असतात. चला तर जाणून घेऊयात.. अशी फळं कोणती आहेत? ज्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते.

  • मनुका

मनुका शरीराला खूप पोषक असणारा पदार्थ आहे. गोड पदार्थ बनवायचे असल्यावर मनुक्याचा वापर शक्यतो लोकं करतात. पिवळे मनुके सुकलेल्या द्राक्षांचाच एक प्रकार आहे. 100 ग्रॅम मनुक्यात 3 ग्रॅम प्रोटीन आढळते.

  • पेरु

पेरु या फळामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात प्रोटीन (Protein) आढळते. साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पेरु फायदेशीर आहे. पेरु खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. पेरुमध्ये 2.55 ग्रॅम प्रोटीन आढळते.

Fruits
  • खजूर

अरब देशांमध्ये मोठ्या प्रमाणात खजूरचे उत्पादन घेतले जाते. खजूर शरीरासाठी खूप पौष्टीक आहे. यात फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर यांचे प्रमाण भरपूर असते. याशिवाय लोह, व्हिटॅमिन पण आढळते.

  • खारका

शरीरासाठी खूप पौष्टीक आणि फायदेशीर असणारा पदार्थ म्हणजे खारका. या प्रोटीनयुक्त पदार्थाचा समावेश आवश्यक आपल्या आहारात करावा. खजूरामध्ये 2.18 ग्रॅम प्रोटीन आढळते.

  • कीवी

कीवी हे फळ (Fruit) शरीरासाठी चांगला प्रोटीन सोर्स आहे. प्रोटीनसोबत व्हिटॅमिन-सी, फाइबर, व्हिटॅमिन-ई ही पोषक तत्वे पण कीवीमध्ये आढळतात. हृदयाचे आरोग्य चांगले राहते. पचनक्रिया सुधारते.

या 5 फळांचा समावेश आहारात आवश्यक करावा. शरीराची प्रोटीनची गरज भागवण्यासाठी ही फळं फायदेशीर आहेत. शरीराला अधिक कार्यक्षम करण्यासाठी पोषक पदार्थ खावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT