Fried Rice Recipe At Home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

रात्री उरलेल्या भातापासून बनवा चटपटीत फ्राईड राईस; जाणून घ्या कृती

Fried Rice Recipe At Home : पुढच्या वेळी उरलेला भात फेकून देण्याऐवजी त्याच्यापासून चविष्ट आणि मसालेदार फ्राईड राईस बनवा.

दैनिक गोमन्तक

Fried Rice Recipe At Home : अनेकदा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात उरलेला भात पुढच्या जेवणात खावासा वाटत नाही. अशा स्थितीत घरातील महिलांपुढे त्यांना फेकून देण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. तुम्हालाही असाच त्रास होत असेल, तर पुढच्या वेळी उरलेला भात फेकून देण्याऐवजी त्याच्यापासून चविष्ट आणि मसालेदार फ्राईड राईस बनवा. फ्राईड राईस बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्या टिप्स फॉलो कराव्या लागतील हे जाणून घ्या.

(Fried Rice Recipe At Home)

फ्राइड राइस बनवण्यासाठी साहित्य :

  • 1 कप उकडलेले तांदूळ

  • 1 कप चिरलेला कांदा

  • 1 कप बीन्स

  • आवश्यकतेनुसार लसूण

  • 1 कप गाजर

  • आवश्यकतेनुसार मीठ

  • 1/2 टीस्पून मिरची पावडर

  • 1/2 टीस्पून चिली फ्लेक्स

  • 1/2 टीस्पून व्हिनेगर

  • 1 टीस्पून टोमॅटो सॉस

रात्री उरलेल्या भातापासून मसालेदार फ्राईड राईस बनवण्यासाठी प्रथम एका कढईत तेल गरम करा. आता त्यात किसलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परता. कांदा चांगला परतून झाल्यावर त्यात चिरलेले गाजर, बीन्स घालून दोन ते तीन मिनिटे परतून घ्या.

आता त्यात मीठ, मिरची पावडर, चिली फ्लेक्स, फ्राईड राईस मसाला, केचप आणि व्हिनेगर घालून सर्वकाही चांगले मिसळा. या तयार मसाल्यामध्ये शिजलेला भात घाला, नीट मिसळा, झाकण बंद करा आणि 2 मिनिटे शिजू द्या. तुमचा मसालेदार फ्राईड राईस तयार आहे. त्यावर कोथिंबीर टाका आणि गरमागरम सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Travel 2026: 'Goa Trip' महागणार! दिवाळीत गोव्यातील हॉटेल्सच्या दरांत 42% वाढीचा अंदाज; व्हिलाचे भाडे तब्बल 5.8 लाखांवर

Meta Fine 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Russian Woman Viral Video: 'पाणीपुरी नको!' म्हणत रशियन महिलेनं फिरवली पाठ; पण भेळपुरीची चव चाखताच म्हणाली, Wow.... पाहा व्हिडिओ

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! भारतीय खेळाडूकडून हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, पोलिसांकडून कारवाई

SCROLL FOR NEXT