भुजंगासन
भुजंगासन Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Daily योग: पाठदुखीसाठी करा तिर्यक भुजंगासन

दैनिक गोमन्तक

तिर्यक भुजंगासन

संस्कृत भाषेत सापाला भुजंग असं म्हणतात. हे आसन करताना शरीराचा वरचा भाग हातांच्या सहाय्याने उचलला जातो. उचललेला शरीराचा वरील भाग हा सापाच्या फण्यासारखा दिसतो. म्हणून याला भुजंगासन म्हणतात. 'तिर्यक भुजंगासन' हा भुजंगासनाचाच एक प्रकार आहे. (For back pain, do Bhujangasan)

तिर्यक भुजंगासन कसे करावे?

प्रथम जमिनीवर पालथे झोपून पाय सरळ रेषेत ठेवावे. यावेळी दोन्ही पायाची पावले व टाचा एकमेकांना स्पर्श करतील याची खात्री करावी. त्यानंतर हाताचे तळवे जमिनीवर ठेवून खांद्याखाली घ्यावे. हाताचे कोपरे शरीराला लागून समांतर असावेत. एक दीर्घ श्वास घेऊन हळूहळू डोके, छाती, पोट उचलावं. आता हातांचा आधार घेत तुमचे शरीर जमिनीपासून वर उचला. आता श्वास घेत उजव्या बाजूला फिरून श्वास सोडत डाव्या पायाच्या पंज्याला बघण्याचा प्रयत्न करावा आणि डाव्या बाजूला फिरून श्वास सोडत उजव्या पायाच्या पंज्याला बघण्याचा प्रयत्न करावा.

तिर्यक भुजंगासनाचे फायदे कोणते?

- पाठिच्या कण्याची लवचिकता वाढते.

- पाठदुखीची समस्या दूर होते.

- बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

- पोटाचे विकार दूर होतात.

- ओटीपोटातील स्नायू मोकळे होतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Goa Todays Live Update: कर्नाटकाने म्हादईचे पाणी वळवण्यासाठी केलेल्या कामांची पाहणी होणार: CM सावंत

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

Goa 2075 देशातील पहिली लाईव्ह कादंबरी; अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या पाच व्यक्तींची कथा

SCROLL FOR NEXT