Food in Winter  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Food in Winter : बदलत्या हवामानात शरीर ठेवा निरोगी; खा 'या' गोष्टी

Food in Winter : तुमच्या आहारात आणि दैनंदिन दिनचर्येत काही बदल करावेत.

दैनिक गोमन्तक

नोव्हेंबर महिना सुरू झाला असून हवामान पूर्वीसारखे उष्ण राहिलेले नाही. उष्मा कायम असला तरी त्याची तीव्रता कमी झाली आहे. तसेच, आता सकाळी उशिरा प्रकाश पडत आहे तर संध्याकाळ लवकर होऊ लागली आहे.

हे बदल स्पष्टपणे लक्षात येऊ शकतात. हे पाहता आता तुम्ही तुमच्या आहारात आणि दैनंदिन दिनचर्येत काही बदल करावेत. जेणेकरून तुम्ही आजारी पडण्यापासून दूर राहाल आणि तुमचे शरीर हिवाळ्याच्या स्वागतासाठी तयार होऊ शकेल.

या पदार्थांपासून सुरुवात करा

गूळ-शेंगदाणे

या दिवसात गूळ - शेंगदण्याचे सेवन शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. या दोन्ही गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या खाऊ शकता किंवा एकत्र. किंवा तुम्ही गूळ आणि शेंगदण्याचेलाडूही तयार करून ठेऊ शकता. हे लाडू खूप दिवस टिकतात आणि या दिवसात तुमच्या शरीराला ऊर्जा देतात.

रताळे खा

रताळे बाजारात येऊ लागले आहेत. त्याचे सेवन सुरू करा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा याचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात आणि शरीर थंडीचे स्वागत करण्यासाठी सज्ज होते. ज्यांना खूप थंडी वाटते त्यांनी रताळ्याचे सेवन जरूर करावे. कारण यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह चांगल्या प्रमाणात असते, ज्यामुळे शरीराला थंडीशी लढण्याची ताकद मिळते.

खारीक

खारीक हे एक ड्राय फ्रूट आहे, ज्याला तुम्ही ड्राय डेट्स या नावानेही ओळखता. आता वेळ आली आहे, जेव्हा तुम्ही रोज सकाळी एक ग्लास दुधासोबत 4 ते 6 खारीक खाऊ शकता. रात्री झोपण्यापूर्वी ते पाण्यात भिजत ठेवावे आणि सकाळी ते पाणी बाहेर काढल्यानंतर ते चांगले धुवून पुन्हा खावे. आतापासून दुधासह त्यांचे सेवन सुरू करा.त्यामुळे शरीर मौसमी रोग, सर्दी, फ्लू, ताप पसरवणाऱ्या विषाणूंशी लढण्यासाठी तयार होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

SCROLL FOR NEXT