Green Vegetables Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Food For Brain: मेंदूच्या निरोगी आरोग्यासाठी तुम्ही 'या' भाज्या खाल्ल्याच पाहिजेत

Food For Brain: जे मेंदूच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात.

दैनिक गोमन्तक

Food For Brain: आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत आपला आहारदेखील दिवसेंदिवस बदलताना दिसत आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा आपल्या शारिरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम तर होत असतोच मात्र तुम्हाला हे माहीती आहे का कि आपल्या आहाराचा आपल्या शारिरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो.

आपल्यापैकी अनेकजण बुद्धीमत्तेसाठी किंवा मेंदूने दीर्घकाळापर्यंत आपले कार्य सुरळित पार पाडावे यासाठी बदाम, अक्रोड खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र काही भाज्यादेखील अशा आहेत ज्या आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम मानल्या जातात.

चला तर जाणून घेऊयात अशा कोणत्या भाज्या आहेत ज्याचा आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी फायदा होतो आणि आपल्या मानसिक आरोग्यासाठी उत्तम मानल्या जातात.

पालक

पालक खाणे तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे कारण त्यात व्हिटॅमिन ए, ल्युटीन आणि कॅरोटीन सारख्या अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. पालकामध्ये फोलेट आणि व्हिटॅमिन के असते, जे मेंदूच्या योग्य विकासासाठी आवश्यक असतात.

भेंडी

भेंडीमध्ये पॉलीफेनॉल आणि व्हिटॅमिन बी 6 असते. जे मेंदूच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात. विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी, स्मरणशक्ती कमकुवत होण्यापासून रोखण्यासाठी भेंडी उपयुक्त मानली जाते. भेंडीमध्ये असणारे लेक्टिन प्रोटीन कॅन्सरच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते. भेंडी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.

टोमॅटो

टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते, जे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. टोमॅटो अँटिऑक्सिडंट्सचे चांगले स्त्रोत आहेत. लाइकोपीन आणि बीटा-कॅरोटीन अँटिऑक्सिडंट्स टोमॅटोमध्ये आढळतात. हे मेंदूच्या पेशींना नुकसान होण्यापासून रोखण्यासाठी हे आवश्यक असल्याचे म्हटले जाते.

गाजर, कोबीमध्येदेखील हे बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट आढळतात. त्यामुळे या भाज्या आपल्या मानसिक आणि शारिरिक आरोग्यासाठी उत्तम मानल्या जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT