Parenting Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Parenting Tips: मुलांना अशा लावल्या जाऊ शकतात चांगल्या सवयी

Parenting Tips: तर तुमच्यातील नात्यामध्ये दुरावा येण्याची जास्त शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

Parenting Tips: मुलांच्या वाढत्या वयात त्यांच्या आसपास असणाऱ्या माणसांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा मोठा परिणाम होत असतो. आजच्या बदलत्या जीवनशैलीचा देखील मुलांच्या वागण्याबोलण्यावर परिणाम होत असतो.

बऱ्याचदा मुले हट्टीपणा करतात, चिडचिड करतात किंवा रागवतात कित्येकदा ही मुले आपल्यापेक्षा वडीलधाऱ्यांना उलट उत्तरे देताना दिसतात, भांडताना देखील दिसतात. अशावेळी अनेक पालकांना कसे समजवायचे, त्यांना चांगल्या सवयी कशा लावायाच्या, त्यांचा हट्टीपणा कसा कमी करावा याबाबत प्रश्न पडलेले दिसून येतात.

आज आपण जाणून घेऊयात अशा लहान मुलांना न रागवता त्यांच्यावर चांगले संस्कार कसे करावेत किंवा त्यांना वाढवताना काय काळजी घ्यावी हे पाहुयात.

मुलांना मोठे करताना काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे ठरते. आपल्या मुलांसोबत बोलताना सन्मामाने बोलण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

जेव्हा तुमची मुले तुमच्याशी बोलत असतात, तेव्हा त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐका. जेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर विनम्रतेने वागाल तेव्हा तुमच्या कृतींचा त्यांच्यावर परिणाम होईल.

जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही तुमच्या मुलांना वचन देता. तेव्हा ते वचन तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमची मुले तुमच्यावर जास्त विश्वास ठेवतील. जर तुम्ही त्यांना कशाचातरी विश्वास देऊन ते पूर्ण करत नसाल तर तुमच्यातील नात्यामध्ये दुरावा येण्याची जास्त शक्यता आहे.

जेव्हा तुमची मुलं काहीतरी चांगले काम करतात. तेव्हा त्यांचे कौतुक करायला विसरु नका. तुमच्या कौतुक करण्याने त्यांचा उत्साह वाढेल.

तुमच्या मुलाने एखादी चुकीची गोष्ट केली असेल किंवा करत असेल तर ओव्हर रिअॅक्ट करण्यापासून स्वताला थांबवा. तुमचे मूल तसे का करत आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा आणि पून्हा वाईट अथवा चूकीची गोष्ट करण्यापासून त्याला कसे रोखता येईल यासाठी प्रयत्न करा.

अशाप्रकारे आपल्या मुलांनी केलेल्या चूकीच्या गोष्टींसाठी त्यांच्यावर ओरडून अथवा त्यांना मारुन त्यावर उपाय करता येत नाही. अनेकदा पालक किंवा त्यांच्या आसपास असणारी मोठी माणसे ज्या कृती करतात त्यांमधून लहान शिकत असतात. त्यामुळे पालकांनी आपल्या वागणूकीची काळजी घेतली पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT