पायांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'या' घरगुती टिप्स  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

पायांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'या' घरगुती टिप्स

दूध, हळद, बेसनचे मिश्रण लावल्याने पायावरील मृत त्वचा (Dead skin) निघून जाण्यास मदत मिळते.

दैनिक गोमन्तक

आठवड्यावड्यातील एक दिवस पायांची काळजी घेणे (Foot Care) आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण चेहरा(face), केस (Hair) आणि हाताची (Hand) काळजी घेतो त्याप्रमाणेच पायांची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. पायाची काळजी घेण्यासाठी वापरुन पाहा या तीन घरगुती टिप्स.

* हळद, दूध आणि बेसन

हळदमध्ये औषधीयुक्त गुणधर्म असतात. दूधामुळे पाय मॉइस्चराइज होऊन नरम पडतात. यासाठी एक चमचा हळद पावडर, 2 चमचे बेसन आणि 1 चमचा थंड दूध घ्यावे. आता याचे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे. नंतर हे मिश्रण पायावर लावावे. 5 ते 10 मिनिटानंतर पाय स्वच्छ पाण्याने धुवावे. यामुळे पायावरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत मिळते.

* कोमट पाण्याचा वापर

पायावरील घाण आणि टाचांवर असलेली धुळ काढण्यासाठी स्क्रबणे घासावे. यासाठी 10 ते 15 मिनिटे कोमट पाण्यात ठेवावे. जर तुमचे पाय आणि पोटऱ्या दुखत असतील कोमट पाण्यात थोडे मीठ टाकून त्यात पाय टाकून बसावे. यामुळे पायामधील वेदना लगेच कमी होण्यास मदत मिळते. बोटांची नखे वाढली असतील तर ती नियमित कापावी. वाढलेल्या नखाच्या खाली कडक कागद ठेवून नख कापल्यास नखाचे कोपरे देखील व्यवस्थित कापता येतात. हा सर्वोत्तम घरगुती उपायांपैकी एक आहे.

* बाटाट्याचा वापर

बटाटा एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे. यामुळे तुमची त्वचा उजळण्यासाठी मदत करते. यासाठी बटाट्याचा खीस करून पायावर 10 ते 15 मिनिटे चांगले घासावे. यानंतर पायाला स्वच्छ पाण्याने धुवावे. असे केल्याने पायवारील काळे डाग कमी होऊन त्वचा मऊ होण्यास मदत मिळते.

या घरगुती तीन पद्धतींचा वापर केल्याने पायाची त्वचा (Skin) मऊ (Soft) आणि सुंदर (Beautiful) बनण्यास मदत मिळते. आपल्या शरीराच्या इतर भागाप्रमाणे आपण आपल्या पायांचीसुद्धा काळजी (Foot care) घ्यायला पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT