Acro Yoga Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Acro Yoga म्हणजे काय? जाणून घ्या फायदे

अॅक्रो योगा हा एक प्रकारचा शारिरिक योगा आहे.

Puja Bonkile

Acro Yoga: शरिर निरोगी राहण्यासाठी योगा करणे फायदेशीर ठरते. फिट राहण्याचा हा एक बेस्ट उपाय आहे. योगा करणे शाररीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगला मानला जातो. सध्या अॅक्रो योगाचा नवा ट्रेंड वाढत आहे. अॅक्रो योग हा अॅक्रोबॅटिक्स, थाय मसाज आणि योगाचे मिश्रण आहे. हा योग करण्यासाठी दोन व्यक्तींनी एकत्र सराव करणे गरजेचे असते. या योगामध्ये स्ट्रेच आणि जिम्नॅस्टिक यांचा समावेश होतो. हा योग प्रकार केल्याने वजन नियंत्रणात ठेवता येते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

  • अॅक्रो योग म्हणजे काय?

अॅक्रो योगा हा एक प्रकारचा शारीरिक व्यायाम आहे. यामध्ये योग आणि अॅक्रोबॅटिक्सचा समावेश असतो. चीअरलीडिंग, डान्स अॅक्रो आणि सर्कस आर्टची झलक पाहायला मिळते. हा योगा तुम्ही एकटे किंवा दोघांमध्ये करू शकता.

अॅक्रो योगाचे फायदे कोणते?

  • एकाग्रता वाढते

अॅक्रो योगा केल्याने एकाग्रता वाढते. दररोज दोन ते तीन मिनिटे या योगाचा सराव केल्याने एकाग्रता वाढते आणि काम देखील व्यवस्थित होते. हा योगा हे मेंदूसाठी फायदेशीर मानला जातो.

  • लवचिकता वाढवते

योगा केल्याने स्नायुंना ताण पडतो. यामुळे शरीराची लवचिकता वाढते. शरीराचे अनेक आजार दूर होण्यास मदत मिळते.

  • मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर

हा योग प्रकार केल्याने मानसिक आरोग्य चांगले राहते. अॅक्रो योग केल्याने मन शांत राहण्यास मदत मिळते.

  • स्नायु मजबुत होतात

अॅक्रो योगा हा एक डायनॅमिक वर्कआउट आहे. जो शरीराच्या स्नायूंना मदत करतो. असे केल्याने शरीर मजबूत होते आणि कार्यक्षमता वाढते. त्यामुळे कोणतेही काम करताना लवकर थकवा येत नाही.

  • अॅक्रो योगा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी

अॅक्रो योग करताना दोन लोकांची गरज असते.

हा योग करताना अशा व्यक्तीसोबत हा योग करा, ज्याच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता.

प्रोफेशनल प्रशिक्षकाकडून ट्रेनिंग घेऊनच हा अॅक्रो योगा सुरू करावा.

अॅक्रो योगा करतांना हळूहळू सरावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT