Feng Shui Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Feng Shui Vastu Tips: आयुष्यात प्रगती हवी? मग फॉलो करा फेंगशुईच्या 'या' सोप्या टिप्स

वास्तूशास्त्र आपल्या आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.

Kavya Powar

Feng Shui Vastu Tips: वास्तूशास्त्र आपल्या आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. चिनी वास्तूशास्त्र फेंगशुई हे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. वास्तुशास्त्राप्रमाणे, लोक त्यांच्या घरात फेंगशुई उत्पादने आणि वस्तू वापरतात.

फेंगशुईनुसार, जर तुमचे जीवन अनेक समस्यांनी घेरले आहे, तर तुम्ही फेंगशुईमध्ये सांगितलेले काही सोपे उपाय करून पाहू शकता आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांवर मात करू शकता.

या फेंगशुई उपायांनी उजळेल नशीब

जर तुम्हाला आर्थिक चणचण भासत असेल आणि पैशाची कमतरता तुमचा आनंद हिरावून घेत असेल तर तुमच्या घरात बांबूचे रोप लावा. फेंगशुईच्या मान्यतेनुसार, बांबूची वनस्पती संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करते.

घराच्या दिवाणखान्याच्या दक्षिण-पूर्व दिशेला फेंगशुई बेडूक ठेवल्याने व्यक्तीला पैशाची कमतरता भासत नाही. यामुळे सौभाग्य वाढते आणि करिअरमध्येही प्रगती होते.

लाफिंग बुद्धाची मूर्तीदेखील प्रभावशाली आहे. घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवायची असेल तर लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवा. फेंगशुईच्या मान्यतेनुसार लाफिंग बुद्धाला घरात ठेवल्यास त्याचा परिणाम लवकर दिसून येतो.

जर सतत मेहनत करूनही तुमची नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल तर यासाठी तुम्ही घरात एक सुंदर विंड चाइम लावा. यामुळे व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात.

व्यवसायात प्रगती करायची असेल तर कामाच्या ठिकाणी दोन्ही हात वर करून असलेली लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवा. यामुळे लवकरच व्यवसायात नफा होईल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT