Liver health tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fatty Liver: फॅटी लिव्हरची सुरुवातीला कोणती दिसतात लक्षणे? जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय अन् डॉक्टरांचा सल्ला घ्या

Fatty Liver Early Symptoms: यकृताला शरीराचा मॅनेजर म्हणतात. त्यामुळे त्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. फॅटी लिव्हर हा यकृताचा सामान्य आजार आहे.

Manish Jadhav

यकृताला शरीराचा मॅनेजर म्हणतात. त्यामुळे त्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. फॅटी लिव्हर हा यकृताचा सामान्य आजार आहे. सहसा या आजाराची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात दिसत नाहीत. मात्र ती दिसून जरी आली तरी आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे हे लिव्हर फॅटी होण्याचे मुख्य कारण बनते. त्यानंतर शरीराच्या अवयवांमध्ये आजार दिसू लागतात. म्हणून, फॅटी लिव्हरची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि ताबडतोब उपचार सुरु करणे गरजेचे ठरते.

लिव्हर फॅटी होण्याची अनेक कारणे आहेत. या कारणांमध्ये मद्य आणि मांसाचे जास्त सेवन, जंक फूडचे अतिसेवन आणि खराब जीवनशैली (Lifestyle). यकृतामध्ये फॅट जमा होण्याची ही काही प्रमुख कारणे आहेत. सुरुवातीला, यकृत फॅट जमा होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते, परंतु जेव्हा यकृताचे प्रयत्न अयशस्वी होतात तेव्हा काही लक्षणे दिसायला लागतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर समस्या उद्भवू शकते.

सुरुवातीला फॅटी लिव्हरची कोणती लक्षणे दिसतात?

आरएमएल हॉस्पिटलमधील मेडिसिन विभागाचे डॉ. सुभाष गिरी यांनी सांगितले की, जेव्हा यकृत फॅट जमा होण्यापासून थांबवू शकत नाही, तेव्हा काही सिग्नल देते. पहिला सिग्नल म्हणजे अजिबात भूक न लागणे. याशिवाय, पोट फुगल्यासारखे वाटते. दुसरा सिग्नल पोटात सतत सौम्य वेदना होतात. तर तिसरा सिग्नल पोट व्यवस्थित साफ न होणे. यकृतामध्ये फॅट जमा होण्याची ही काही सुरुवातीची लक्षणे आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करु नये.

समस्या वाढू शकते

याशिवाय, यकृत इतर काही संकेत देखील देते. यामध्ये थोडे काम केल्यानंतर थकवा जाणवणे देखील समाविष्ट आहे. तसेच, अशक्तपणा, मळमळ आणि उलट्या होणे ही देखील यकृतामध्ये फॅट जमा होण्याची सुरुवातीची लक्षणे आहेत.

डॉक्टरांशी संपर्क साधा

जर तुम्हाला काही दिवस किंवा आठवड्यांपासून वरील लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधावा. डॉक्टरांच्या (Doctor) सल्ल्यानुसार सुरुवातीला आहार आणि दैनंदिन दिनचर्या बदलून तुम्ही गंभीर यकृताच्या आजारापासून स्वतःचे रक्षण करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT