Smartphone Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fast Charging मुळे फोन फुटतात? जाणून घ्या काय आहे सत्य

Smart Phone ची बॅटरी Fast Charging मुळे खराब होते? फोनचा स्फोट कशामुळे होतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घ्या.

दैनिक गोमन्तक

आजच्या युगात आपल्याच सगळंच अगदी फास्ट हवं असतं. तंत्रज्ञानाच्या मदतीने मिळणाऱ्या वेगवेळ्या सुविधांच्या माध्यमातून या गरजा पुर्ण देखील केल्या जातात. माणसाच्या जीवनाचा असाच एक अविभाज्य भाग म्हणजे मोबाईल. मात्र आता मोबाईलला (Smartphone) आवश्यक असणारी चार्जींगसुद्धा फास्ट व्हावी म्हणून फास्ट चार्जिंग आणि सुपर फास्ट चार्जिंग असलेले स्मार्टफोन बाजारात आले आहेत. यूएसबी टाइप सी-सीसह सुसज्ज असलेले हे नवीन चार्जर 10 पट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. या फास्ट चार्जरच्या (Fast Charging) मदतीने, फोन 20 ते 30 मिनिटांत शून्य ते 100% पर्यंत चार्ज होतो. मात्र अनेक वेळा असा प्रश्न पडतो की, ही चार्जिंग सुरक्षित आहे का? कारण जलद चार्जिंग बॅटरी खराब करते असा समज अनेकांना आहे आणि त्यामूळेच ग्राहकांकडून फोनचा स्फोट होऊ शकतो ता असा प्रश्न उपस्थित केला जातो.

फास्ट चार्जिंग हानिकारक आहे का?

वास्तविक फोनच्या बॅटरीमध्ये ठराविक सायकल्स असतात. म्हणजे जर तुमची बॅटरी 500 ते 600 बॅटरी सायकलसह असेल तर फोनची बॅटरी शून्य ते 100% पर्यंत 500 ते 600 वेळा चार्ज केली जाऊ शकते. त्यानंतर फोनची बॅटरी निकामी होते. जर तुम्ही फोनला शून्यावरून 50 टक्के चार्ज केले, तर पुढच्या वेळी तुम्ही शून्यावरून 50 टक्के चार्ज केल्यास, एक सायकल पूर्ण होईल. त्यामुळे हा समज चुकीचा आहे की, फास्ट चार्जिंग बॅटरीला लवकर खराब करते.

फास्ट चार्जिंगमुळे फोनमध्ये स्फोट होतो का?

फोन फक्त फास्ट चार्जिंगमुळे फुटत नाही. याला वेगवेळी कारणं असू शकतात. फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान असलेले स्मार्टफोन अनेक सिक्युरीटी फिचर्ससह येतात. तसेच, फास्ट चार्जिंगला सपोर्ट करण्यासाठी फोनला ड्युअल सेल सपोर्ट देण्यात आला आहे, जेणेकरून चार्जिंग दरम्यान फोनची बॅटरी गरम होत नाही. फास्ट चार्जिंगसाठी वेगळ्या प्रकारचे सर्किट दिलेले असते. अशा परिस्थितीत फास्ट चार्जिंगमुळे फोनमध्ये स्फोट झाल्याची माहिती खरी नाही.

स्फोट का होतात?

तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार बहुतांशवेळी स्फोटाचे कारण मॅन्युफॅक्चरिंग डिफॉल्ट असतो. फोनच्या निर्मितीदरम्यान अनेक वेळा लिथियम-आयन बॅटरी हवेत संपर्कात येते. यामुळेच फोनमध्ये स्फोट होण्याची शक्यता जास्त आहे.

एक्सट्रीम प्रेशर

फोनवर कधीही जास्त दबाव आणू नका. बऱ्याचवेळा असे दिसून येते की, लोक फोन मागच्या खिशात ठेवतात. त्यामुळे अशा पद्धतिने फोन ठेवून खाली बसल्यावर फोनवर अतिरिक्त दबाव येतो, जो फोनच्या बॅटरीसाठी धोकादायक असतो. अशा स्थितीत फोनची बॅटरी खराब होण्याची शक्यता असते. लिथियम हा एक धोकादायक पदार्थ आहे, जो हवेच्या संपर्कात आल्याने स्फोट होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT