Shopping Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shopping Tips: शॉपिंगला जाताय? मग अशी करा परफेक्ट जीन्सची निवड

योग्य कपडे घातल्यास आपला आत्मविश्वास देखील वाढतो.

Puja Bonkile

Shopping Tips: योग्य कपडे घातल्यास आपला आत्मविश्वास देखील वाढतो. यामुळे कपड्यांची योग्य निवड करणे गरजेचे असते. जर तुम्ही जीन्स खरेदी करायला जात असाल तर तो तुमच्या बॉडी शेपनुसार खरेदी करावा. मार्केटमध्ये विविध प्रकारचे जीन्स उपलब्ध आहेत. पण ते खरेदी करतांना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

ट्रायल रुमची मदत

अनेक वेळा ट्रायल रुमसमोरील गर्दीमुळे अनेक लोक फक्त बघूनच त्यांना जीन्स तंतोतंत बसेल असा समज करतात. परंतु, जेव्हा जीन्स घरी घालुन पाहता, तेव्हा ते नीट फिंटिंगला बसत नाही. यामुळे जीन्स ट्रायल रूममध्ये घातल्यानंतरच खरेदी करावा. तसेच, प्रत्येक डेनिम ब्रँडचा आकाराचा चार्ट वेगळा असतो.

योग्य शरीर रचना

जीन्स घालणे कम्फर्टेबल आहे. तसेच जीन्ससोबत कोणताही टॉप,कुर्ता घालता येतो. यामुळे तुम्हाला एक हटके लुक देखील मिळतो. तुमच्या शरीराची शरीराची रचना लक्षात घेऊन तुम्ही कपडे खरेदी करायला पाहिजे. तुमच्या कंबरेचा साइज पाहुण जीन्स खरेदी करावा.

योग्य फॅब्रिक

अनेकदा कपडे खरेदी करताना लोक त्याच्या फॅब्रिककडे लक्ष देत नाहीत. डेनिममध्ये 100 टक्के कॉटन, कॉटन-पॉलिएस्टर मिक्स, कॉटन-पॉलिएस्टर स्पॅन्डेक्स मिक्स इत्यादी अनेक प्रकारचे फॅब्रिक्स आहेत. डेनिम जीन्स खरेदी करण्यापूर्वी, त्याच्या लेबलवर लिहिलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. फक्त तुम्हाला सूट होईल असे फॅब्रिक खरेदी करा.

आरामदायी जीन्स

हायवेस्टेड प्रकारातील जीन्स घातल्यावर कंबर लहान दिसते आणि मांड्यांना एक छान आकार मिळतो. मार्केटमध्ये अशा अनेक जीन्स उपलब्ध आहेत. ज्यांच्यामुळे तुमची कंबर सुबक दिसते. अशा जीन्सची निवड करावी. रोज फिटिंगचे जीन्स घातल्यापेक्षा कधी कधी सैल जीन्स देखील घालावे यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल.

कोणत्या कटचा असावा

नेहमी तुमच्या शरीराच्या आकारावर चांगले दिसणारे डेनिम कट्स निवडावे. तुम्ही फ्लेर्ड पॅंट किंवा टॅपर्ड-फिट पॅंट खरेदी करू शकता.

जीन्सची कशी घ्याल काळजी

जीन्स जास्त खराब झाला नसेल तर लगेच धुवु नका.

जीन्स नेहमी उलटी करून धुवावी.

थेट सुर्यप्रकाशात जीन्स वाळवु नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT