Fashion Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fashion Tips: लेहेंगा घालताना फॉलो करा 'या' टिप्स, लग्नात सर्वांची नजर असेल तुमच्यावरच...

लग्नसराईत सुंदर दिसण्यासाठी फक्त मेकअप नाही तर कपड्यांवर देखील लक्ष दिले पाहिजे.

Puja Bonkile

Fashion Tips: भारतातील विवाहसोहळा एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. कारण आपल्या देशात लग्न हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असतो. हे देखील एक कारण आहे की कुटुंबातील सदस्य हा दिवस आणखी खास बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. आई-वडील आपल्या आयुष्यभराची कमाई आपल्या मुलांच्या लग्नावरच खर्च करतात असे नाही तर वधू-वरांच्या बहिणीही आपला लूक खास बनवण्यासाठी खूप पैसा खर्च करतात.

अनेक मुली लग्नांमध्ये लेहेंगा घालतात. यामध्ये त्या खूप सुंदर देखील दिसतात. बाजारात विविध प्रकारचे लेहेंगा मिळतात. पण लेहेंगा निवडताना डिझाइन, स्टाइल यासारख्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

  • योग्य फिटिंग

तुम्ही अनेक मुलींना बॉडी फिटिंग कपडे घातलेल्या पाहिल्या असतील, ज्यामध्ये श्वास घेणेही कठीण होते. यामुळे कोणताही ड्रेस घालताना तुम्हाला कधीही गुदमरल्यासारखे वाटू नये. लेहेंगा हे खूप वजनाचे असतात, जे सांभाळणे सोपे नसते. पण फिटिंगच्या प्रक्रियेत, काही मुली त्यांचा लेहेंगा खूप घट्ट बांधतात, ज्यामुळे त्यांना गुदमरायला सुरुवात होते, ज्यामुळे त्यांचा लूक खराब होऊ शकतो. स्वतःसाठी योग्य फिटिंग लेहेंगा निवडणे महत्वाचे आहे.

  • बॉडी टाइप

लेहेंगा घालताना होणारी सर्वात सामान्य चूक म्हणजे शरीराचा प्रकार, ज्याकडे बहुतेक मुली दुर्लक्ष करताना. काही मुली स्वतःसाठी असा लेहेंगा निवडतात, जो त्यांच्या शरीराच्या प्रकाराला शोभत नाही. सर्व काही प्रत्येकावर चांगले दिसत नाही.यामुळे लेहेंगा निवडताना शरीराच्या प्रकारानुसार निवडावा.

  • योग्य ओढणी

मुलींना त्यांच्या स्टायलिश ब्लाउजसोबत लेहेंगा घालायला आवडते. पण ओढणीची स्टाईल, लांबी आणि फॅब्रिक देखील तुमच्या लुकमध्ये भर टाकते. नेहमी स्टायलिश आणि शोभिवंत ओढणी घ्यावी. तुमची ओढणी दागिन्यांसोबत मॅच करावी.

  • योग्य रंग

योग्य रंगाचा लेहेंगा तुमच्या सौंदर्यात अदिक भर टाकतो. यामुले लेहेंगा खरेदी करतांना योग्य रंगाचा निवडावा. अनेक मुली लाल आणि गुलाबी रंगा निवडतात, पण प्रत्येकाला तो रंग सुट होत नाही. यामुळे तुमच्या स्किन टोननुसार लेहेंग्याचा रंग निवडावा.

  • फॅबरिकची क्कॉलिटी

लेहेंगा खूप जड असतो. त्यावर भरिव काम केलेले असते, ज्यामुळे ते सुंदर दिसते. अशावेळी कापडाची गुणवत्ता पाहणे गरजेचे असते. याचे कारण म्हणजे कमी दर्जाचा लेहेंगा वाईट दिसू शकतो. यामुळे सिल्क, वेलव्हेटसारखे लक्जरी फॅब्रिकचा लेहेंगा खरेदी करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT