goa Dainik Gomantak
लाइफस्टाइल

एफ एन सौझाशी संवाद

पण भविष्यात ह्या प्रतिभावंत चित्रकाराची (Painter) चित्रे विक्रमी किंमतीत विकली जाणार होती

दैनिक गोमन्तक

सौझाचे पाय पाळण्यात दिसतच होते. प्रथम शौचालयात सुरेख चित्रे रेखाटल्याबद्दल त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. नंतर क्रांतिकारी ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप’ चा सदस्य बनल्यामुळे जे जे स्कूल ऑफ आर्टमधून त्याला काढून टाकले. पुढे ख्रिश्चन देवतांची नग्न चित्रे रंगवल्याबद्दल गोव्यातील (Goa) ख्रिश्चन समाजातून त्याला बहिष्कृत करण्यात आले.

पण भविष्यात ह्या प्रतिभावंत चित्रकाराची (Painter) चित्रे विक्रमी किंमतीत विकली जाणार होती व ती जगातल्या प्रतिष्ठित चित्रसंग्रहालयातही दाखल होणार होती. जागतिक किर्ती लाभलेल्या या महान चित्रकाराला एका चित्रप्रदर्शनाद्वारे- ‘पोस्थ्युमोस डायलॉग्स विथ आर्टिस्ट एफ एन सौझा’, परत आपल्या गावात म्हणजे साळगावला घेऊन येणे अभिमानाचे होते.

प्रख्यात चित्रकार रझा यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ‘रझा फाउंडेशन’ने गेल्या महिन्यात गोवा येथील ‘मोग’ संग्रहालयात ‘पोस्थ्युमोस डायलॉग्स विथ आर्टिस्ट एफ एन सौझा’ या कला प्रदर्शनाचे आयोजन केले. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील आणि संस्कृतीमधील 25 कलाकार निवडून, त्यांना मानवी जीवनाला कवटाळून असलेल्या रोग, युद्ध, निसर्ग, मृत्यू यासारख्या विषयांवर कलाकृती निर्माण करण्याची जबाबदारी दिली गेली. सौझा यांनी हेच विषय तीव्रपणे आपल्या चित्रातून प्रगल्भरीत्या हाताळले आहेत.

चारुदत्त पांडे, हर्षदा केरकर, जुलियो डिसौजा, कालिदास म्हामल, केदार धोंडू, प्रमोद प्रकाश, प्रणित सोल, साबा हसन, सचिन नाईक, संतोष मोरजकर, शैलेश दाभोलकर, श्रीपाद गुरव, सिद्धार्थ केरकर, सुधीर पटवर्धन, स्वीटी जोशी, उदय शानभाग, विवान सुंदरामन या कलाकारांचा या उपक्रमात सहभाग होता.

या कलाकारांना हव्या त्या स्वरूपात, माध्यमात आणि रंगात काम करण्याची मुभा होती. मात्र त्यांच्या कलाकृतीचा केंद्रबिंदू सौझाच्या मानसिकतेकडे जुळेल याची खबरदारी त्यांना घ्यायची होती. सौझा आणि त्यांची अभिव्यक्ती यांच्यामधला वैचारिक दुवा ढुंडाळण्याची ही एक प्रकारची प्रक्रिया होती.

सौझाच्या चित्रांमधली कालातीत निराकारता आणि अवकाशाच्या मनोवैज्ञानिक प्रभावांचा शोध घेणे आणि प्रभावी व्यक्तिरेखांच्या माध्यमाने संवाद साधणे हा या प्रदर्शनाचा उद्देश होता. सौझाच्या ‘विच्छेदनात्मक’ शैलीशी जुळतील अशी कलाकृतींची निर्मिती सौझा यांच्याशी ‘मृत्योत्तर संवाद साधताना’ नक्कीच केली गेली. हे प्रदर्शन पिळर्ण येथील मोग म्युझियममध्ये सुरू आहे. ते 30 मे पर्यंत चालेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT