Hair Fall issues Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hair Fall: महिला की पुरुष? कोणाचे केस जास्त गळतात; जाणून घ्या काय आहेत कारणं

जाणून घ्या एका दिवसात किती केस गळू शकतात...

दैनिक गोमन्तक

काही महिलांना वाढत्या वयाबरोबर केस गळण्याची (Hair Fall) समस्या सुरु होते. त्यामुळे आजच्या जीवनशैलीमध्ये केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. अगदी तरुण वयातील मुलींमध्ये देखील ही समस्या असू शकते. या समस्येमूळे अनेकांचा आत्मविश्वास खालावतो. स्त्रियांमध्ये केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात. वैद्यकीय समस्या, हार्मोनल चेंजेस आणि तणाव अशा वेगलेळ्या गोष्टी तुमच्या केस गळण्याचे कारणं असू शकतात. मात्र या केस गळण्याचे प्रत्येकाचे कारण शोधणे सोपे नसते.

औषधे, रोग, संसर्ग किंवा रसायनं या गोष्टी केस गळण्यास जवाबदार देतात. केस गळणे ही स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये एक सामान्य समस्या आहे, परंतु स्त्रिया केस गळण्यामुळे अधिक त्रस्त असतात. असे का? केस गळण्याची समस्या पुरुषांमध्येही असते मात्र, पुरुषांचे टक्कल पडणे ही गोष्ट साधारण आहे मात्र टक्कल असलेल्या महिला आपण सहजसहजी पाहायला मिळते. केस गळण्याची समस्या जर तूम्हाला भेडसावत असेल तर दिवसभरात तूम्ही 100 केस गमावू शकतात.

स्त्रियांमध्ये केस गळण्याची कारणे

1. पौष्टिकतेची कमतरता

बायोटिनची कमतरता, जीवनसत्त्वे सी, डी आणि ई आणि लोहाच्या कमतरतेमुळे केस गळण्याची समस्या निर्माण होऊ शकते. ज्या लोकांना असे वाटते की, त्यांच्या केस गळण्याचा संबंध पोषण अभावाशी संबंधीत आहे त्यांनी स्वतःच हे निदान करू नये. कारण पौष्टिकतेच्या कमतरतेसाठी डॉक्टरच्या मदतीने आपण तपासणी करू शकतो. डॉक्टरांनी पूरक आणि पोषक आहार घेऊन ही कमतरता भरून काढता येते.

2. पीसीओएस

केस गळणे हे पीसीओएसच्या लक्षणांपैकी एक आहे. हे मुख्यतः एंड्रोजेनिक हार्मोन्सच्या अति प्रमाणामूळे होते. पीसीओएस असलेल्या लोकांमध्ये ही समस्या वारंवार उद्भवते. ज्यामुळे पुरळ येणे, केस पातळ होणे आणि केस गळण्यासारख्या समस्या निर्माण होतात.

3. कॉस्मेटिकचा वापर केसांच्या सौंदर्य प्रसाधानांचा जास्त वापर केल्याने सुद्धा केस गळतात. अनेक सौंदर्य प्रसाधनांची उत्पादनांमूळे केस चिकट किंवा ठीसुळ बनवू शकतात. अशा परिस्थितीत, निरोगी आहार आणि चांगली जीवनशैली सुद्धा केस गळणे रोखू शकता.

4. ताण
जर तुमचे केस गळणे तणावाशी संबंधित असेल, तर तुमचे केसांचे रोम कायमचे खराब झालेले नसतात. तुमच्या तणावाचे संतूलन ठेवणे आणि स्वतःची चांगली काळजी घेणे या गोष्टी केस गळणे टाळू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT