Evening Snacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Evening Snacks: संध्याकाळच्या चहासोबत घ्या खस्ता कचोरीचा आस्वाद, नोट करा रेसिपी

संध्याकाळची छोटीशी भुक भागवण्यासाठी तुम्ही खस्ता कचोरी बनवू शकता.

Puja Bonkile

Evening Snacks: संध्याकाळी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न अनेक महिलांना पडतो. संध्याकाळची छोटीशी भुक भागवण्यासाठी तुम्ही खस्ता कचोरी बनवू शकता. ही कटोरी बनवायला सोपी असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया खस्ता कचोरी कशी बनवतात.

खस्ता कचोरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

उकलेली मुग डाळ

बेसण

तेल

हळद

जीरं

तिखट

हिरव्या मिरचीची पेस्ट

आमचुर पावडर

गरम मसाला

डाळिंबाचे दाणे

मीठ

खस्ता कचोरी बनवण्याची कृती

सर्वात पहिले कचोरीसाठी पीठ मळून घ्यावे. यासाठी एका भांड्यात मैदा, मीठ, एक चमचा तेल घालून चांगले मिक्स करावे. नंतर थोडे पाणी घालून पीठ मऊ मळून घ्यावे. २० मिनिट झाकून ठेवावे.

नंतर एका कढईमध्ये तेल टाकावे. नंतर जीरं, हळद, तिखट आमचुर पावडर, गरम मसाला , उकडलेली मूग डाळ टाकून चांगले मिक्स करावे. ४ते ५ मिनिटं मंद आचेवर शिजवावे. नंतर थंड करण्यासठी एका प्लेटमध्ये हे सारण काढावे.

आता मळलेल्या पीठाचे छोटे गोळे करून पोळी लाटावी त्यात मूग डाळचे सारण भरावे. नंतर कढईत सोनेरी होइपर्यंत तळून घ्यावे. तयार आहेत गरमागरम खस्ता कचोरी. सजावटीसाठी तुम्ही डाळिंबाचे दाणे वापरू शकता. तुम्ही चहा किंवा हिरव्या चटणीसोबत आस्वाद घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

VIDEO: 'भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे', मौलाना जरजिस अंसारीचा खळबळजनक दावा; हिंदू संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT