Evening Snacks| Creamy Corn Chaat Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Evening Snacks: संध्याकाळच्या नाश्त्यात घ्या क्रीमी कॉर्न चाटचा आस्वाद, आजच ट्राय करा 'ही' चटपटीत रेसिपी

तुम्हाला जर संध्याकाळच्या नाश्त्यात चटपटीत खायचे असेल तर कॉर्न चाट नक्की बनवु पाहा.

दैनिक गोमन्तक

Creamy Corn Chaat Recipe: अनेकवेळा लोकांना हेल्दी खाण्याचा कंटाळा येतो. तुम्ही काहीतरी चटपटीत खाण्याच्या नादात रेडिमेट तळलेले स्नॅक्स खाता. पण आम्ही तुम्हाला आज एक अशी डिश सांगणार आहोत की जी खाउन तुम्हाला मज्जा येणार आहे. या रेसिपीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या बारीक चिरलेल्या भाज्या देखील घालू शकता. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे.

  • क्रीमी कॉर्न चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 कप उकडलेले स्वीट कॉर्न

5 चेरी टोमॅटो

1 लिंबू

1 टेबलस्पून लाल तिखट

2 चमचे सेव

2 चमचे चिरलेली कोथिंबीर

1/2 कप चिरलेली लाल सिमला मिरची

1/2 टीस्पून चिली फ्लेक्स

1 टेबलस्पून बटर

2 चमचे लसूण मेयोनीज

मीठ- गरजेनुसार

sweet corn
  • क्रीमी कॉर्न चाट बनवण्याची कृती

क्रीमी कॉर्न चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये बटर गरम करावे.

नंतर त्यात लाल शिमला मिरची टाकावी.

मध्यम आचेवर साधारण 1 मिनिट भाजावे.

आता स्वीट कॉर्न टाका.

नंतर एक मिनिट परतून घ्या.

आता लाल तिखट, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ टाका.

नीट मिक्स करा.

हे मिश्रण आता एका बाऊलमध्ये काढून घ्यावे.

चेरी टोमॅटो, लिंबू, कोथिंबीर, शेव आणि लसूण मेयोनेजनी गार्निश करावे.

टिप: तुमच्या आवडीच्या इतरही भाज्या बारीक चिरून टाकू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

SCROLL FOR NEXT