Dry Fruits Dainik Gomatank
लाइफस्टाइल

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात करा 'या' चार ड्रायफ्रुट्सचे सेवन

शरीरात हिमोग्लोबिनची ( Hemoglobin) कमतरता असल्यास अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

दैनिक गोमन्तक

Increase Hemoglobin : हिमोग्लोबिनची ( Hemoglobin) कमतरता सर्वाधिक महिलांमध्ये असते. आपल्या शरीरात ऑक्सीजन (oxygen) वाहून नेण्याचे काम हिमोग्लोबिन करते. शरीरात हिमोग्लोबिनची ( Hemoglobin) कमतरता असल्यास अनेक आजारांना सामोरे जावे लागते. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी खनिजे, लोह, प्रथिने तसेच पोषक तत्वांची नियमित गरज असते. शरीरातील लोहाच्या (Iron)कमतरतेमुळे हिमोग्लोबिनची ( Hemoglobin) समस्या निर्माण होते. परंतु , अनेकजन हिमोग्लोबिन वाढण्याकरिता मोठ्या प्रमाणात औषधी घेतात. यामुळे आरोग्यास (Health) धोका पोहचू शकते. नियमित सकस आहार घेतल्यास हिमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते.

या गोष्टीचे करा सेवन -

  • हिरव्या पालेभाज्या -

    आपल्या आहारात फिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे गरजेचे आहे. कारण हिरव्या पालेभाज्या आरोग्यास लाभदायी असतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे हिमोग्लोबिनवर मात करण्यासाठी पालेभाज्या उपयुक्त ठरतात.

  • शेंगदाणे -

    शेंगदाणे खाणे आरोग्यास लाभदायी असते. शेंगदाण्यामदध्ये लोह , प्रथिने , फायबर , आणि जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. हिमोग्लोबिन वाढविण्याकरिता डाळींम , सोयबिन आणि वाटाणा यांचे आहारात नियमितपणे सेवन करावे.

  • सुकामेवा -

    नियमितपणे खजूर, अक्रोड बदाम आणि मनुका यासारखे सुकामेवे खाल्यास हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत मिळते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. यामुळे शरीरातील रक्त वाढविण्यास मदत करू शकते.

  • सी-फूड -

    सीफूड अनेकांची आवडती डिश आहे. यामध्ये लोह या धाटकाचे प्रमाण अधिक असते. कोळंबी, सुरमई , बांगडा या माशांचा आहारात सेवन करावे. ज्यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात लोह मिळून हिमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते.

  • बीट -

    बरेच लोक आपल्या आहारात निटचा समावेश करतात. बीटचा आपण ज्यूस किंवा कोशिंबीरच्या स्वरूपात सेवन करू शकतो. बीट शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यास मदत करते. नियमित बिटचे सेवन करणाऱ्यांना हिमोग्लोबिनची कमतरता जाणवत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT