Papaya Health Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Papaya Health Benefits: दिवसाच्या 'या' वेळी पपई खाल तर अनेक आजारांपासून दूर राहाल

रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यास तुम्ही दिवसभर ऊर्जावान तर राहाल

Kavya Powar

Papaya Health Benefits: फळे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची असतात. यामध्ये एक नाव येते ते म्हणजे पपई. रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यास तुम्ही दिवसभर ऊर्जावान तर राहालच शिवाय यामुळे तुम्ही अनेक आजारांच्या धोक्यापासून स्वतःला दूर ठेवू शकता. सकाळी रिकाम्या पोटी पपई खाण्याचे काय फायदे आहेत ते खाली जाणून घेऊया.

सकाळी रिकाम्या पोटी पपई खाण्याचे फायदे

पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्समध्ये असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे आपले आरोग्य वाढते. पपईमध्ये असलेले गुणधर्म त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्यात मदत करतात.

जर तुम्हाला कोलेस्टेरॉलचा त्रास असेल तर तुम्ही नक्की पपई खा. कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. पपईमध्ये असलेले फायबर खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. सोबतच पपईमध्ये पोटॅशियम असते जे बीपी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

पपई खाल्ल्याने शरीराला संसर्ग आणि इतर आजारांपासून दूर ठेवता येते. जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी पपई खाता, तेव्हा शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. शरीरात काढून टाकले जातात, जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते.

पपई वजन कमी करण्यासही फायदेशीर आहे. कारण यामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात. त्याचबरोबर पपईमध्ये भरपूर फायबर असते जे भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्या आहारात पपईचा नक्कीच समावेश करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Casino: गोव्यातील कॅसिनोंमध्ये 21 वर्षांखालील तरुणांना प्रवेशबंदी; कडक परवाना आणि 18% व्याजाची दंडात्मक कारवाई

पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही! हणजूण, वागातोर आणि म्हापशात 'FDA'ची धडक मोहीम; अस्वच्छता आढळल्याने तीन दुकाने तात्काळ सील

Goa Bench: जन्मठेपेवरून थेट निर्दोष मुक्तता; मडगावातील दुहेरी खून प्रकरणी, सत्र न्यायालयाचा निकाल गोवा खंडपीठाने बदलला

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT