fennel Dainik Gomantak
लाइफस्टाइल

रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी पिणे आरोग्यदायी

बडीशेप खाल्याने रक्तदाबावर नियंत्रण राहते.

दैनिक गोमन्तक

बडीशेप प्रत्येकाच्या घरी असतेच. सहसा लोकांना जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेपचे खाण्याचे अनेक फायदे आहेत. याचे सेवन केल्याने रक्तदाब कमी होते तसेच आपली पचन संस्था देखील चांगली राहते. ज्या लोकांना प्रदूषण आणि सूर्यप्रकाशामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यांच्यासाठी सुद्धा बडीशेपचे पाणी फायदेशीर ठरते. यात अनेक पोषक घटक असतात. यामुळे बडीशेपचे सेवन आरोग्यासाठी (Health) फादयेशीर मानले जाते.

* पचन संस्था सुरळीत कार्य करते

तुम्हाला जर पोटासंबंधित आजार असतील तर तुम्ही बडीशेपचे सेवन करू शकता. यात अॅनेटॉल, फॅन्चॉन आणि अॅस्ट्रो गोल सारखी घटक असतात, जे पोटातील गॅस, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तुम्हाला जर पचन संस्थेसंबंधित आजार असतील तर तुम्ही बडीशेपच्या पाण्याचे सेवन करू शकता.

* वजन कमी करण्यास फायदेशीर

तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर तुम्ही बडीशेपच्या पाण्याचे सेवन करू शकता. सकाळी रिकाम्यापोटी बडीशेपचे पाणी पिल्यास वजन कमी होऊ शकते. रिकाम्या पोटी सेवन केल्यास डिटोक्स होण्यास मदत मिळते. याशिवाय यात फायबर भरपूर असल्याने पचन संस्था सुरळीत राहते.

* डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते

बडीशेपचे पाणी आपल्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ए आढळते ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच डोळ्यांवरील सूज किंवा जळजळ कमी होते.

* उच्च रक्तदाब

बडीशेपच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहते. तसेच हृदयासंबंधित अनेक आजार दूर ठेवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT