Gift  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tips for Diwali Gift: दिवाळीत चुकूनही घेऊ किंवा देऊ नका असे गिफ्टस्, द्याल संकटाला आमंत्रण

भेटवस्तूबाबत वास्तूशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

सर्वांचा आवडता आणि देशातील सर्वात मोठा सार्वजनिक सण दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीत सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातारवण असते. या सणासुदीच्या काळात एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. भेटवस्तू नाती मजबूत करण्यासाठी आणि प्रेम व्यक्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. पण, भेटवस्तूबाबत वास्तूशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत.

वास्तूशास्त्रानुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कधीही कोणालाही भेट म्हणून देऊ किंवा घेऊ नयेत. अशा गोष्टी दिल्याने आयुष्यात सुखाऐवजी संकटेच येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात अशा कोणकोणत्या वस्तू आहेत ज्या कधीही कोणाला भेट देऊ नयेत.

हिंसक प्राण्याचे चित्र

हिंसक प्राण्याचे चित्र कधीही भेटवस्तू म्हणून देऊ नये. उदा. वाघ, सिंह अशा प्राण्यांचे चित्र भेट म्हणून देणे शुभ मानले जात नाही. अशा चित्रांमुळे घरात अशांतता संकटे येतात आणि शांतता भंग पावते. तसेच, तीक्ष्ण वस्तू कधीही गिफ्टमध्ये देऊ नये, यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

भेट म्हणून रुमाल देऊ नका

वास्तूशास्त्रानुसार, भेट म्हणून रुमाल कधीही देऊ नये. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

निसर्ग चित्रे

वास्तुशास्त्रानुसार निसर्गाशी संबंधित चित्रे भेट म्हणून देऊ नयेत. विशेषतः वाळवंट, सुकलेली झाडे, बुडणारी जहाजे, बुडता चेहरा अशी छायाचित्रे कोणालाही देऊ नयेत किंवा कुणाकडून घेऊ नयेत. अशा प्रकारच्या भेटवस्तूमुळे घरात अनेक समस्या निर्माण होतात.

घड्याळ

वास्तूनुसार घड्याळ कोणालाही भेट म्हणून देऊ नये. अनेकदा लग्नसमारंभात किंवा वाढदिवसाला भेट म्हणून घड्याळ दिले जाते. पण, घड्याळ भेट म्हणून देणे शुभ मानले जात नाही. घड्याळ भेट म्हणून दिल्याने आयुष्यात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT