Yoga
Yoga Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Yoga : 'हे' आसन रोज केले तर केस गळतीपासून होईल सुटका, वाचा...

Ganeshprasad Gogate

आजच्या धकाधकीच्या जीवनात केस गळणे ही एक अतिशय सामान्य समस्या बनली आहे. वाढता ताणतणाव, रासायनिक खतांद्वारे पिकवलेले अन्न, बदलते हवामान या साऱ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. या व्यतिरिक्त, कोविड-19 महामारीमुळे सध्याच्या काळात सर्व वयोगटातील लोकांमध्ये केस गळण्याचे प्रमाणही वाढले आहे. कोविड नंतरच्या काळात अनेकांना केसगळतीची समस्या सुरु झाली.

तुमचे केस घनदाट दिसावेत यासाठी व्हिटॅमिन ए, प्रथिने, जस्त, लोह आणि व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचा समावेश असावा. आपल्या भारतीय संस्कृतीला आयुर्वेद आणि विविध प्रकारच्या आसनांची मोठी परंपरा लाभली आहे. जशी शरीर बळकटीसाठी आसन केले जातात तशीच केसांच्या वाढीसाठी सुद्धा काही आसन सांगितली आहेत. जाणून घेऊया..

अधोमुख श्वान आसन -

एकूण आरोग्यासाठी बारा आसन सूर्यनमस्कार हे सर्वोत्तम योग आसनांपैकी एक मानले जाते. अधोमुख श्वान आसन हे डोक्यातील रक्त प्रवाह आणि ऑक्सिजनचे परिसंचरण सुधारण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे जे केसांच्या वाढीस मदत करू शकते. या आसनाचा दररोज काही काळ सराव केल्यास केसगळती बऱ्याच अंशी कमी होऊ शकते.

शीर्षासन-

शिर्षासन हे आसन करणं तसं कठीण आहे. मात्र, या आसनामुळे हे टाळूमध्ये रक्तप्रवाह सुरळीच चालू ठेवण्यास मदत होते. शिर्षासनामुळे केस गळणेही कमी होते, ज्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारते.

मत्स्यासन-

या आसनाला 'फिश पोझ' म्हणूनही ओळखले जाते. हे आसन ज्यांना लांब, मजबूत आणि चमकदार केस हवी आहेत त्यांच्यासाठी आवश्यक आहे. फिश पोझमध्ये डोके मागे खेचणे समाविष्ट असते ज्यामुळे पुन्हा रक्त प्रवाह आणि टाळूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. या आसनाचा दररोज सराव केल्याने तुम्ही केवळ केसगळतीच नाही तर केसांच्या बहुतांश समस्यांपासून मुक्त होऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT